Kabul Airport Firing: काबुल विमानतळाच्या गेटजवळ गोळीबार, पुन्हा एकदा चेंगराचेंगरीची घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 05:46 PM2021-08-28T17:46:09+5:302021-08-28T17:47:05+5:30
Kabul Airport Firing: अफगाणिस्तानातील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशात दहशतवादी कारवाया सुरू झाल्या आहेत.
Kabul Airport Firing: अफगाणिस्तानातील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशात दहशतवादी कारवाया सुरू झाल्या आहेत. इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेकडून आत्मघाती हल्ला झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा काबुल विमानतळाच्या गेटजवळ गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराला अमेरिकन सैन्याकडूनही प्रत्युत्तर दिलं गेलं आहे.
काबुल विमानतळाच्या गेटवर जोरदार गोळीबार झाल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आणि मोठा गोंधळ उडाला. यात चेंगराचेंगरी देखील झाल्याचं समोर आलं आहे. यात अश्रूधुरांचाही वापर करण्यात आला आहे.
स्थानिक अफगाणिस्तानी वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, काबुल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात जवळपास १६९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पत्रकारांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच मृत्यूमुखींमध्ये १३ अमेरिकी सैनिकांचाही समावेश आहे.