खुलासा! Joe biden यांना ठार करणार होता अलकायदा; ओसामा बिन लादेननं परवानगी दिली नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 12:34 PM2021-08-23T12:34:42+5:302021-08-23T12:52:35+5:30

अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेन याने २०१० मध्ये त्याच्या साथीदारांना एक पत्र लिहिलं होतं

Afghanistan Taliban: Osama Bin Laden wrote letter Kill Obama to Make Biden President of America | खुलासा! Joe biden यांना ठार करणार होता अलकायदा; ओसामा बिन लादेननं परवानगी दिली नाही, कारण...

खुलासा! Joe biden यांना ठार करणार होता अलकायदा; ओसामा बिन लादेननं परवानगी दिली नाही, कारण...

googlenewsNext
ठळक मुद्देपत्रात ज्यो बायडन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करण्याबाबत उल्लेख होता. अलकायदाचे काही दहशतवादी अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी बायडन यांची हत्या करु इच्छित होते.जर ज्यो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले असते तर अलकायदासाठी ही चांगली संधी होती.

नवी दिल्ली – अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबानींनी कब्जा केल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन (Joe Biden) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. बायडन यांच्या राजकीय प्रवासाबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. आता ओसामा बिन लादेन(Osama Bin Laden) याच्या उल्लेखानंतर ज्यो बायडन यांच्या राजकारणावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

अलकायदा संधीच्या शोधात होता

अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेन याने २०१० मध्ये त्याच्या साथीदारांना एक पत्र लिहिलं होतं. ज्यात ज्यो बायडन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करण्याबाबत उल्लेख होता. त्या पत्रात म्हटलं होतं की, बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यास त्याचा फायदा दहशतवादी संघटनांना होऊ शकतो असं लादेनला वाटत होतं.

बायडनची हत्या करण्यापासून लादेननं का रोखलं?

३ मे २०१२ मध्ये अमेरिकन न्यूज एजेन्सी एबीसी वेबसाईटनुसार, या पत्रात ओसामा बिन लादेनने त्याच्या इतर सहकाऱ्यांना सांगितले होते की, ओबामाच्या हत्येचा प्लॅन बनवा परंतु बायडन यांच्यावर हल्ला करु नका. कारण ते राष्ट्राध्यक्ष पदासाठी ते पूर्ण तयारीत नाहीत. ओबामा यांच्या हत्येनंतर बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील असं ओसामा बिन लादेनला वाटत होते. जर ज्यो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले असते तर अलकायदासाठी ही चांगली संधी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अलकायदाचे काही दहशतवादी अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी बायडन यांची हत्या करु इच्छित होते. परंतु ओसामा बिन लादेन याने ते होऊ दिले नाही. बायडन यांच्याकडे सरकार चालवण्याची कुवत नाही. अडचणीत ते देशाला सांभाळू शकणार नाहीत. बायडन राष्ट्रपती बनल्यास अमेरिकेवर संकट येईल त्यासाठी बायडन यांना निशाणा बनवू नका असं लादेनने बजावलं होतं. हे पत्र २०१० मध्ये लिहिलं होतं. लादेनच्या ४८ पानांच्या डायरीत ३६ व्या पानावर लिहिलं होतं की, ते हल्ला करण्यासाठी दोन गट तयार करणार होते. ज्यातील एक यूनिट पाकिस्तानात तर दुसरी अफगाणिस्तानात असेल. त्यामुळे लादेन याच्या पत्रामुळे ज्यो बायडन यांच्या नेतृत्वावर अमेरिकेत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Afghanistan मध्ये तालिबान उभं करण्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जामागे पाकिस्तान आणि त्याच्या गुप्तचर यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या खासदाराक़डून करण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे खासदार स्टीव शॅबॉट हे हिंदू पॉलिटीकल अॅक्शन कमिटीच्या एका व्हर्च्युअल बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांना शरण देण्याच्या भारताच्या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला. "आपण सर्व जाणतोच, विशेष करून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेनं अफगाणिस्तानात तालिबानला पुन्हा उभं करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अफगाणिस्तावर तालिबाननं मिळवलेल्या ताब्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी विजय साजरा करणं हे अतिशय वाईट आहे," असंही शॅबॉट म्हणाले.

Web Title: Afghanistan Taliban: Osama Bin Laden wrote letter Kill Obama to Make Biden President of America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.