Afghanistan Taliban Crisis: OMG! हजारो लोकं वाट बघत राहिले; एकट्या UK कमांडोच्या पत्नीला घेऊन विमानानं उड्डाण केले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 03:50 PM2021-08-21T15:50:36+5:302021-08-21T15:51:21+5:30

यात एका रॉयल मरीन कमांडोनं त्याचा अनुभव शेअर केला आहे. या व्यक्तीचं नाव पॉल पेन फार्थिंग असं आहे.

Afghanistan Taliban: shocking news when former uk marine evacuation his wife on empty aircraft | Afghanistan Taliban Crisis: OMG! हजारो लोकं वाट बघत राहिले; एकट्या UK कमांडोच्या पत्नीला घेऊन विमानानं उड्डाण केले

Afghanistan Taliban Crisis: OMG! हजारो लोकं वाट बघत राहिले; एकट्या UK कमांडोच्या पत्नीला घेऊन विमानानं उड्डाण केले

Next

अफगाणिस्तानवरतालिबानींनी कब्जा केल्यानंतर देशात खळबळ माजली आहे. तालिबानींच्या दहशतीमुळे अनेकजण देश सोडून पलायन करत आहेत. अफगाणिस्तानातील अनेक फोटो व्हिडीओ समोर आले आहेत. जीव धोक्यात घालून लोक एअरपोर्टवरुन बाहेरच्या देशात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातच एक व्हिडीओ समोर आला ज्यात लोक विमानाला लटकून प्रवास करत असल्याचं दिसून आलं. काहीजण हवेतून खाली जमिनीवर कोसळले. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात लोकांचे जीव जात आहेत.

यात एका रॉयल मरीन कमांडोनं त्याचा अनुभव शेअर केला आहे. या व्यक्तीचं नाव पॉल पेन फार्थिंग असं आहे. काबुल विमान तळावर जेव्हा हजारो लोक देश सोडण्याच्या प्रयत्नात होते तेव्हा पॉलची पत्नीही त्याठिकाणी अडकली होती. जिला एकटीला रिकाम्या प्लेनमधून नॉर्वेला पाठवण्यात आलं. हजारो लोक गर्दीतून विमानाची वाट बघत होते. कुठल्याही मार्गातून ते अफगाणिस्तानातून पलायन करण्याच्या स्थितीत होते. त्यावेळी ही घटना घडली.

फार्थिंगची पत्नी सी १७ ग्लोबमास्टर सैन्य परिवहन विमानाने नॉर्वे येथे जात होती. हे विमान संपूर्णपणे खाली होते. अफगाणिस्तानातील जनता देश सोडण्यासाठी जीव धोक्यात घालत होते तेव्हा कमांडोच्या पत्नीसाठी हे विमान सोडण्यात आले. पॉल फार्थिंगनेच हा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्याने लिहिलंय की, प्रत्येक तासाला विमानतळावरुन उड्डाण होत होतं. भलेही ते भरले असो वा नसो. लोकांना एअरपोर्टच्या आतमध्ये जाण्यास मनाई केली होती. आम्ही त्याठिकाणी खूप लोकांना सोडलं. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा अमेरिकन सेनेचं कॉर्गो प्लेनने लोकांना घेऊन उड्डाण भरलं. फार्थिंग म्हणाला की, रात्री एअरपोर्टवर जाण्यासाठी धोका होता. परंतु एअरपोर्टवर पोहचल्यानंतर हजारोंच्या गर्दीतून वाट काढण्यास आम्हाला यश आलं.

परंतु फार्थिंग यांच्या फोटोवर लोकांनी सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स फार्थिंग यांच्या कृत्यावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. अखेर एक संपूर्ण प्लेन एकट्या पत्नीसाठी का सोडण्यात आले? असा सवाल लोकांनी केला आहे. हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. असं पुन्हा कधीच होऊ नये. सरकारने मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियातून करण्यात येत आहे.  

Read in English

Web Title: Afghanistan Taliban: shocking news when former uk marine evacuation his wife on empty aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.