Afghanistan Taliban Crisis: तालिबानींनी घर जाळलं, जीव वाचवण्यासाठी एअरपोर्ट गाठलं; ५ बहिणींनी थरार सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 06:40 PM2021-08-21T18:40:33+5:302021-08-21T18:41:42+5:30
मागील आठवड्यापर्यंत आम्ही आमच्या घरात हसत-खेळत जीवन जगत होतो. त्यानंतर तालिबानींनी आमचं घर जाळलं.
अफगाणिस्तानवर दहशतवादी संघटना तालिबानचा कब्जा झाल्यानंतर त्याठिकाणची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. काबुल एअरपोर्टवर गोंधळाची स्थिती आहे. तालिबानींच्या जाचातून सुटका करण्यासाठी कुठल्याही मार्गानं लोक अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. काबुल एअरपोर्टवर हजारोंच्या संख्येने महिला विमानाची प्रतिक्षा करत बसल्या आहेत. जेणेकरून तालिबानींच्या हातून त्यांची इज्जत आणि जीव दोन्ही वाचेल.
काबुल एअरपोर्टच्या बाहेर गर्दीत अडकलेल्या ५ बहिणींनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. तालिबानींनी त्या बहिणींच घर जाळलं. अफगाणिस्तानातून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात त्या अयशस्वी ठरल्या. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या ५ बहिणी हजारा समुदायाच्या आहेत ज्या हिंदू कुश डोंगरातील मध्य अफगाणिस्तानात हजराजतमध्ये राहणाऱ्या शिया समूह आहे. तालिबानी खूप काळापासून या समुदायावर विशेषत: महिलांचे शोषण करत आहे.
जर देशाच्या स्वातंत्र्यावेळी भाजपा सरकार सत्तेत असतं तर जम्मू काश्मीर भारताचा भाग नसतं #MehboobaMufti#India#Taliban#BJPhttps://t.co/gZFoBdzpKr
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2021
हायस्कूलमध्ये शिकणारी १९ वर्षाची विद्यार्थींनी आईना शेख यांनी सांगितले की, ती तिच्या ४ बहिणी आणि भावासोबत विमानतळावर खूप दिवस झाले बसलो आहोत. आम्हाला अमेरिकेत जायचं आहे. आम्ही याठिकाणी सुरक्षित नाही. या चौघा भावंडांपैकी कुणाकडेही पासपोर्ट नाही. व्हिसा कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना प्रवासाची परवानगी मिळत नाही. परंतु त्यांना देश सोडण्यासाठी कुणीतरी मदत करेल अशी आशा लागून राहिली आहे.
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता ३१ ऑगस्टनंतर तालिबानींचं प्लॅनिंग काय? #AfghanistanCrisis#Talibanihttps://t.co/XcNmOyMddQ
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2021
आईना म्हणते की, मागील आठवड्यापर्यंत आम्ही आमच्या घरात हसत-खेळत जीवन जगत होतो. त्यानंतर तालिबानींनी आमचं घर जाळलं. आमच्या आईवडिलांनी आम्हाला जायला सांगितले कारण आमच्या जीवाला धोका होता. अलीकडच्या काळात तालिबानींनी महिला आणि मुलींना पत्नी किंवा सेक्स स्लेव बनवण्याच्या बातम्या आल्या. तालिबानींच्या दहशतीपासून वाचत आम्ही ५ भावंडे काबुल एअरपोर्टवर २४० किमी प्रवास करून आलो. फूटपाथवर आम्ही झोपतोय. २५ वर्षाचा भाऊ नादेर आणि एक सेल्समॅन त्यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडे काही पैसे आहेत तेच आम्ही खर्च करतो. मला माहिती नाही हे कधीपर्यंत चालेल. तालिबानींच्या दहशती आम्हाला ठाऊक नाहीत परंतु आमच्या आईवडिलांनी सांगितले की, इतिहासात कशारितीने तालिबानींनी हजारा समुदायाच्या हजारो लोकांना मारलं होतं. आइनाची २३ वर्षीय बहिण हाफिजाह काबुलच्या एका पॉलिटेक्निकमध्ये कॅम्प्यूटर विज्ञानाचं शिक्षण घेते. तर तिच्या अन्य बहिणी हवा, लतीफा आणि १८ वर्षाची मरजानही आहे.