Afghanistan: तालिबानींनी जत्रा भरवली! काबुल मिळताच पार्कमध्ये घुसले, मौजमस्ती सुरु; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 11:01 AM2021-08-17T11:01:10+5:302021-08-17T11:24:09+5:30
Afghanistan crisis, Market closed in First day of Taliban capture: रविवारी तालिबानने राजधानी काबुलवर ताबा मिळवला. तालिबानला न लढताच काबुल मिळाले. राष्ट्राध्यक्ष गनी यांनी काबुवासियांच्या जिवाचा हवाला देत पलायन केले.
अफगानिस्तान (Afghanistan) मध्ये 20 वर्षांनी पुन्हा एकदा तालिबानने (Taliban) कब्जा केला आहे. रविवारी तालिबानने राजधानी काबुलवर ताबा मिळवला. तालिबानला न लढताच काबुल मिळाले. राष्ट्राध्यक्ष गनी यांनी काबुवासियांच्या जिवाचा हवाला देत पलायन केले. यानंतर लढाईच जवळपास संपल्याने तालिबानचे दहशतवादी काबुलच्या एम्यूजमेंट पार्कमध्ये मौजमस्ती करताना दिसले. याचे व्हिडीओ (Taliban Video) व्हायरल झाले आहेत. (A day after taking over Kabul, Taliban enjoy at amusement park.)
Afghanistan: अमेरिकेला एकच चूक नडली; तालिबानच्या मास्टरमाईंड बरादरला 2018 मध्ये सोडले तिथेच फसले
एम्यूजमेंट पार्कमध्ये तालिबानींचे मस्ती करतानाचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत तालिबानी हातात बंदुका घेऊन गो कार्टिंग करताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडीओत हे तालिबानी घोड्यांवर (खेळण्यातल्या) बसून मौजमस्ती करताना दिसत आहेत.
काबुल ताब्यात घेतल्यानंतर आता तालिबानच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दोहामध्ये अफगानिस्तानच्या भविष्याबाबत चर्चा सुरु आहे. तालिबान बदलल्याचा जरी दावा करत असला तरी देखील 20 वर्षांपूर्वीच्या तालिबानची दहशत कायम असल्याने हजारो अफगानींना देश सोडायचा आहे. यासाठी जिवाच्या आकांताने हे लोक काबुल विमानतळाबाहेर जमले आहेत. एकीकडे हे लोक चिंतेत असताना तालिबानी दहशतवादी मौजमस्ती करत आहेत.
#Kabul amusement park #Afghanistanpic.twitter.com/ELK0GjrwAm
— Hamid Shalizi (@HamidShalizi) August 16, 2021
रविवारी तालिबानने काबुलवर कब्जा मिळविला. सोमवार हा तालिबानचा काबुलमधील पहिला दिवस होता. टोलो न्यूजनुसार एका दिवसातच अफगानिस्तानमध्ये मोठा बद झाला. दुकाने, उद्योग, सरकारी कार्यालये बंदच होती. वाहतुकीवरही परिणाम जाणवला. महिला देखील सार्वजनिक ठिकाणी कमी दिसल्या.
Another one #Kabulpic.twitter.com/dLTRP2KZOX
— Hamid Shalizi (@HamidShalizi) August 16, 2021
सरकारी कार्यालये, संस्था लवकरात लवकर सुरु केल्या जाव्यात. लोक आपली कामे लवकरात लवकर सुरु करु शकतील, अशी मागणी लोकांकडून होत आहे. शहरात बेकायदा पद्धतीने बंदुका घेऊन दहशतवादी फिरत आहेत. यावर चिंता व्यक्त करताना पुढील काळात कमी वेळा घरातून बाहेर पडणार असल्याचेही काही लोकांनी सांगितले.