Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा, डोनाल्ड ट्रम्पला फायदा अन् बायडन यांना मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 04:50 PM2021-08-19T16:50:42+5:302021-08-19T16:52:50+5:30

Survey: या प्रश्नावर उत्तर देताना बहुतांश अमेरिकेतील लोकांनी ट्रम्प यांच्या तुलनेत ज्यो बायडन दोषी असल्याचं म्हटलं आहे.

Afghanistan Taliban; Trump Would Win The Us Presidential Election Today Voter Are Angry With Biden | Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा, डोनाल्ड ट्रम्पला फायदा अन् बायडन यांना मोठा फटका

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा, डोनाल्ड ट्रम्पला फायदा अन् बायडन यांना मोठा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देनोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ज्यो बायडन यांना ५१.३ टक्के मतं मिळाली होती ट्रम्प यांना ४६.८ टक्के मतदान झाल्याने राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होताआज अमेरिकेत निवडणुका घेतल्यास ४३ टक्के लोकांनी डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांना पसंती दिली

वॉश्गिंटन – अफगाणिस्तानवर(Afghanistan तालिबाननं कब्जा केला आहे त्यामुळे संपूर्ण जग सध्या चिंतेत आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून त्यांचे सैन्य परत बोलावल्यानंतर २ आठवड्यातच तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन(Joe Biden) यांच्या या निर्णयावरुन जगभरात त्यांच्यावर टीका होत आहे. एका सर्व्हेनुसार, जर अमेरिकेत आज निवडणुका घेतल्या तर तर ज्यो बायडन यांना मोठा फटका बसेल तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्याचा फायदा होताना पाहायला मिळत आहे.

ज्यो बायडन यांच्याविरोधात अमेरिकेतील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ ३७ टक्के लोकांनी सध्याच्या परिस्थितीत निवडणुका झाल्यास ज्यो बायडन यांच्या बाजूने मतदान करू असं म्हटलं आहे . सर्व्हेनुसार, आज अमेरिकेत निवडणुका घेतल्यास ४३ टक्के लोकांनी डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांना पसंती दिली आहे. तर १४ टक्के लोकांनी अन्य उमेदवाराला मत देऊ असं म्हटलं आहे. या अन्य उमेदवाराच्या नावाचा खुलासा सर्व्हेत केला नाही.

नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ज्यो बायडन यांना ५१.३ टक्के मतं मिळाली होती तर डोनाल्ड ट्रम्प यांना ४६.८ टक्के मतदान झाल्याने राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. Rasmussen नुसार यावेळी ट्रम्प महिला आणि इतर वर्णीय लोकांची जास्तं मते मिळू शकतात. हा सर्व्हे अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परतल्यानंतर १६ आणि १७ ऑगस्टदरम्यान केला होता. Rasmussen द्वारे विचारण्यात आलं होतं की, युद्धग्रस्त देश तालिबानच्या कब्जात गेल्याबद्दल कोण दोषी आहे?

या प्रश्नावर उत्तर देताना बहुतांश अमेरिकेतील लोकांनी ट्रम्प यांच्या तुलनेत ज्यो बायडन दोषी असल्याचं म्हटलं आहे. सर्व्हेनुसार, ८७ टक्के डेमोक्रेटला मत दिल्याबद्दल संतुष्ट आहेत तर ९५ टक्के रिपब्लिकन दिलेले मतं योग्य असल्याचं म्हणतात. बुधवारी सकाळी ट्रम्प यांनी अफगाणिस्तान प्रकरणावरुन ज्यो बायडन यांच्यावर टीका केली. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा हा क्षण आहे अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांच्या निर्णयावर प्रहार केला.

Web Title: Afghanistan Taliban; Trump Would Win The Us Presidential Election Today Voter Are Angry With Biden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.