Afghanistan Taliban Crisis: काबुल एअरपोर्टवर अमेरिकन सैन्याचा कब्जा; हल्ला केल्यास याद राखा, तालिबानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 04:15 PM2021-08-17T16:15:34+5:302021-08-17T16:23:36+5:30

काबुल एअरपोर्टवरील जे फोटो समोर येत आहेत. ते खूप भयावह आहेत. हे फोटो पाहिले तर काबुल एअरपोर्टवर काय चित्र आहे ते स्पष्ट होईल.

Afghanistan Taliban: Us Forces In Kabul Airport People Fear That If Left Then Chaos Will Spread | Afghanistan Taliban Crisis: काबुल एअरपोर्टवर अमेरिकन सैन्याचा कब्जा; हल्ला केल्यास याद राखा, तालिबानला इशारा

Afghanistan Taliban Crisis: काबुल एअरपोर्टवर अमेरिकन सैन्याचा कब्जा; हल्ला केल्यास याद राखा, तालिबानला इशारा

Next

 नवी दिल्ली – अफगाणिस्तानात सध्या तालिबानी सत्ता आहे. देश तालिबानच्या हाती गेल्यानं अफगाणी लोकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे अफगाणिस्तान सोडण्याच्या तयारी अनेक लोक आहेत. दोन दशकाच्या युद्धानंतर अमेरिकेने त्यांचे सैनिक पूर्णपणे परत बोलावलं आहे. अमेरिकेच्या या पाऊलानंतर दोन आठवड्यातच तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. १९९० पर्यंत अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा होता. त्यानंतर आता पुन्हा अफगाणिस्तान तालिबानच्या हाती गेला आहे.

काबुल एअरपोर्टवरील जे फोटो समोर येत आहेत. ते खूप भयावह आहेत. हे फोटो पाहिले तर काबुल एअरपोर्टवर काय चित्र आहे ते स्पष्ट होईल. या फोटोतून अमेरिकन सैन्य हटले तर..भारतासह अन्य देशातील नागरिकांना याठिकाणाहून रेस्क्यू करणं कठीण होईल.

काबुल एअरपोर्टच्या सुरक्षेसाठी अमेरिकन सैन्याचे १ हजार अतिरिक्त जवान तैनात आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर काबुल एअरपोर्टवर अराजकता माजली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेच्या सैन्यांनी दोन सशस्त्र लोकांना मारलं.

afghanistan latest news us forces in kabul airport people fear that if forces left then chaos will spread

तालिबानी सत्ता आल्यानंतर लोकांमध्ये इतकी दहशत आहे की, कुठल्याही स्थितीत देश सोडण्यासाठी लोकांनी काबुल एअरपोर्टवर गर्दी केली आहे. एअरपोर्टवर हजारोंच्या संख्येने गर्दी झाली आहे. विमानात चढण्यासाठी लोकांची चढाओढ लागली आहे. या गोंधळात अमेरिकन सैन्याने इशारा म्हणून गोळीबारी केली. त्यात ५ लोकांचा जीव गेल्याची बातमी आहे.

अमेरिकेने तालिबानला इशारा दिलाय की, जर त्यांनी अमेरिकन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, अफगाणिस्तानातील त्यांच्या कॅम्पना बाधित केले तर अमेरिका त्याविरोधात कठोर आणि आक्रमक कारवाई करेल. अमेरिकन सैन्याचे उच्च अधिकारी म्हणाले की, आम्ही तालिबानी नेत्यांशी समोरासमोर चर्चा केली आहे. एअरपोर्टहून लोकांना बाहेर जाण्याच्या कामात अडथळा आणू नका असा आग्रह धरला आहे.

-5-

दोन दशक सुरू असलेल्या युद्धानंतर अमेरिकेने त्यांचे सैनिक पूर्णपणे परत बोलावले आहेत. अमेरिकेच्या या निर्णयानंतर दोन आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. १९९६ ते २००१ दरम्यान तालिबानद्वारे लोकांवर करण्यात आलेले अत्याचार आणि त्या कटू आठवणीच्या जखमा आजही लोकांच्या मनात कायम आहेत. तालिबानाच्या हिंसक कृत्यामुळे महिला चिंतेत आहेत. तालिबानी काळात महिलांना घरातच राहण्यास त्या मजबूर होत्या.

Web Title: Afghanistan Taliban: Us Forces In Kabul Airport People Fear That If Left Then Chaos Will Spread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.