Afghanistan Updates : तालिबान लवकरच करणार आपल्या राज्याची घोषणा; अफगाणिस्तानला देणार असं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 12:08 AM2021-08-16T00:08:41+5:302021-08-16T00:16:19+5:30

तालिबानी (Taliban) दहशतवादी काबूलमध्ये घुसले आहेत. त्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. तसेच आता तालिबान लवकरच संपूर्ण अफगाणिस्तानवर आपल्या राज्याची औपचारिक घोषणा करणार आहे.

Afghanistan Updates Taliban to announce its dominion soon | Afghanistan Updates : तालिबान लवकरच करणार आपल्या राज्याची घोषणा; अफगाणिस्तानला देणार असं नाव

Afghanistan Updates : तालिबान लवकरच करणार आपल्या राज्याची घोषणा; अफगाणिस्तानला देणार असं नाव

Next

काबुल - अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडताच तालिबानी (Taliban) दहशतवादी काबूलमध्ये घुसले आहेत. त्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. तसेच आता तालिबान लवकरच संपूर्ण अफगाणिस्तानवर आपल्या राज्याची औपचारिक घोषणा करणार आहे. एपी या वृत्तसंस्थेने तालिबानच्या एका नेत्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, हा दहशतवादी समूह राष्ट्रपती भवनातून लवकरच 'इस्लामिक एमिरेट ऑफ अफगानिस्तान'ची घोषणा करेल. तालिबानची राजवट असताना सप्टेंबर 2001पर्यंत हेच देशाचे नाव होते. तालिबानी नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एपीला ही माहिती दिली. कारण, त्याला माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही. (Afghanistan Updates Taliban to announce its dominion soon)

काबुल एअरपोर्टवर आग, USचा आपल्या नागरिकांना सल्ला  -
दरम्यान, काबूल विमानतळावर आग लागल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी लपण्याचा सल्ला दिला आहे. अफगाणिस्तानच्या राजधानीत सुरक्षिततेची स्थिती झपाट्याने बदलत असल्याचे काबूलमधील अमेरिकन दूतावासाने रविवारी एका सुरक्षा अलर्टमध्ये म्हटले आहे. यात विमानतळांचाही समावेश आहे, त्यामुळे लोकांनी सुरक्षित आणि सतर्क राहावे. 

राष्ट्रपती भवनावर तालिबानचा कब्जा -
अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर कब्जा केल्याचा दावा तालिबानच्या कमांडर्सनी केला आहे. मात्र, अद्याप अफगाण सरकारकडून यासंदर्भात पुष्टी करण्यात आलेली नाही. याचवेळी, अफगाणिस्तानात सत्ता हस्तांतरणासाठी कुठलेही अंतरिम सरकार बनविण्यात येणार नाही, असेही तालिबानने म्हटले आहे. तसेच, आपण अफगाणिस्तान पूर्णपणे नियंत्रणात घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला - 
दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली आहे. टोलो न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. दरम्यान, अशरफ गनी हे तझाकिस्तानला रवाना झाल्याची माहिती सरकारमधील एका मंत्र्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. तालिबान तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा काबुलवर आपली सत्ता प्रस्थापित करत आहे. 2001 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तालिबानची सत्ता गेली होती.

Web Title: Afghanistan Updates Taliban to announce its dominion soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.