"भारतानं 20 वर्षं शत्रूला मदत केली..."; काश्मीरसंदर्भात तालिबान स्पष्टच बोलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 06:55 PM2021-09-01T18:55:21+5:302021-09-01T19:00:15+5:30

तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारत आणि काश्मीरसंदर्भात अफगाणिस्तानचा दृष्टिकोन काय असेल? हा प्रश्नदेखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तालिबान आणि पाकिस्तानचे घनिष्ठ संबंध आहेत आणि काश्मीरबाबतचा पाकिस्तानचा दृष्टिकोन हा सर्वश्रुत आहे.

Afghanistan we will not interfere in kashmir issue that is against our policy says Taliban leader | "भारतानं 20 वर्षं शत्रूला मदत केली..."; काश्मीरसंदर्भात तालिबान स्पष्टच बोलला!

"भारतानं 20 वर्षं शत्रूला मदत केली..."; काश्मीरसंदर्भात तालिबान स्पष्टच बोलला!

googlenewsNext

काबूल - अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने हवेत जोरदार गोळीबार करत आनंद साजरा केला. माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, तर आता तालिबानचे संपूर्ण लक्ष नव्या सरकारच्या निर्मितीवर आहे, यासंदर्भात सातत्याने बैठका आणि चर्चाही सुरू आहेत. तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारत आणि काश्मीरसंदर्भात अफगाणिस्तानचा दृष्टिकोन काय असेल? हा प्रश्नदेखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तालिबान आणि पाकिस्तानचे घनिष्ठ संबंध आहेत आणि काश्मीरबाबतचा पाकिस्तानचा दृष्टिकोन हा सर्वश्रुत आहे. (Afghanistan we will not interfere in kashmir issue that is against our policy says Taliban leader)

काश्मीरमधील हस्तक्षेप धोरणाच्या विरोधात -
तालिबानचे नेते अनस हक्कानी यांनी न्यूज-18 सोबत बोलताना काश्मीर आणि भारतासंदर्भातील तालिबानची भूमिका स्पष्ट केली. हक्कानी म्हणाले की, काश्मीर आमच्या अधिकार क्षेत्राचा भाग नाही आणि या प्रकरणात हस्तक्षेप करणे धोरणाच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या धोरणाच्या विरोधात कसे जाऊ शकतो? 'अर्थातच आम्ही हस्तक्षेप करणार नाही.' अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत हक्कानी म्हणाले, 'मी विश्वास देऊ इच्छितो, की सर्व जण अफगाणिस्तानात सुरक्षित आहेत.'

तालिबानकडून काबुल विमानतळ बंद, देश सोडण्यासाठी लाखो नागरिकांची सीमेकडे धाव

भारतासोबत चांगल्या संबंधांसाठी तयार - 
भारतासोबत संबंधांच्या प्रश्नावर हक्कानी म्हणाला, आम्हाला भारताशी चांगले संबंध हवे आहेत. आपल्याबद्दल कुणीही चुकीचा विचार करू नये, अशी आमची इच्छा आहे. भारताने 20 वर्षं आपल्या शत्रूला मदत केली, पण आम्ही सर्व काही विसरून संबंध पुढे नेण्यास तयार आहोत. अफगाणिस्तानमधील अपूर्णावस्थेत असलेल्या भारताच्या प्रकल्पांसंदर्भात तालिबानी नेता म्हणाला, आम्ही आगामी काही दिवसांतच सर्व धोरण स्पष्ट करू. आम्हाला अफगाणिस्तानच्या लोकांसाठी मदत हवी आहे. आम्हाला फक्त भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे समर्थन हवे आहे.

मला आणि कुटुंबीयांना वाचवा...; १३ वर्षांपूर्वी बायडेन यांना वादळातून वाचवणाऱ्या अफगाणीची विनंती

हक्कानी नेटवर्कला मिळू शकते महत्वाचे स्थान -
काबूल गुरुद्वारावरील 2020 च्या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेने हक्कानी नेटवर्कवर आरोप केले होते, ते आरोप फेटाळून लावत, तालिबान नेता म्हणाला, हा फक्त शत्रू आणि माध्यमांनी केलेला प्रचार आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमध्ये हक्कानी नेत्यांनाही महत्त्वाची भूमिका मिळू शकते. गेल्या काही दिवसांत आलेल्या छायाचित्रांमध्ये तालिबान आणि वरिष्ठ हक्कानी नेते अनेक वेळा एकत्र दिसले. हक्कानी नेटवर्कचा वरिष्ठ नेता काबूलमध्ये आहेत आणि काबूल विमानतळाची सुरक्षा हक्कानी नेटवर्कच्या हातात आहे.

Web Title: Afghanistan we will not interfere in kashmir issue that is against our policy says Taliban leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.