Afghanistan Crisis: तालिबान विरोधकांची जमवाजमव; संघर्षासाठी सज्ज झालेल्या जमावाच्या वेगवान हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 04:14 PM2021-08-19T16:14:15+5:302021-08-19T16:14:49+5:30

काबुलमध्ये तालिबान आल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर, अमरुल्लाह पंजशीरला गेले आणि अजूनही ते तिथं आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Afghanistan's defense minister has begun mobilizing people opposed to the Taliban. | Afghanistan Crisis: तालिबान विरोधकांची जमवाजमव; संघर्षासाठी सज्ज झालेल्या जमावाच्या वेगवान हालचाली

Afghanistan Crisis: तालिबान विरोधकांची जमवाजमव; संघर्षासाठी सज्ज झालेल्या जमावाच्या वेगवान हालचाली

Next

काबुल: अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबानला रोखठोक आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानवरतालिबानी संकट कोसळलेलं असताना राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला. मात्र मी तालिबान्यांना घाबरून देश सोडणार नाही, अशी ठाम भूमिका अमरुल्लाह सालेह यांनी घेतली आहे. 

काबुलमध्ये तालिबान आल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर, अमरुल्लाह पंजशीरला गेले आणि अजूनही ते तिथं आहेत, असं त्यांनी सांगितलं. अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदीदेखील अमरुल्लाह यांच्याबरोबर असल्याचीही शक्यता आहे.

पंजशीरमधील सुत्रांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, अमरुल्लाह सालेह आणि अहमद मसूद यांनी पूर्व उत्तर आघाडीचे प्रमुख कमांडर आणि सहकाऱ्यांशी पुन्हा संपर्क केला असून त्या सर्वांनाही संघर्षात सहभागी होण्यासाठी तयार केलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात मोठी घौडदौड पाहायला मिळत आहे. काबुलपासून जवळपास तीन तासांच्या अंतरावर असलेला पंजशीर प्रांत हा तालिबानविरोधी संघर्षासाठी ओळखला जातो. 1996 पासून 2001 पर्यंत तालिबानच्या शासन काळादरम्यानही हा प्रांत त्यांच्या ताब्यात नव्हता. त्याठिकाणी नॉर्दर्न अलायन्सनं तालिबानशी दोन हात केले होते.

दरम्यान, तालिबाननं काबुलवर कब्जा केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी साहेल यांनी युद्धग्रस्त प्रांताचा काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून स्वत:च्या नावाची घोषणा केली. "मी आता देशाचा काळजीवाहू राष्ट्रपती असून हा निर्णय मी कायद्याच्या चौकटीत राहून घेतलेला आहे. तत्कालीन राष्ट्रपतीच्या अनुपस्सथितीत उपराष्ट्रपती म्हणून देशाला सांभाळण्याची माझी जबाबदारी आहे", असं सालेह यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सालेह यांनी तालिबान्यांना अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचं जाहीर केलं आणि पाकिस्तानवरही हल्लाबोल केला आहे. 

तालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत-

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत आहे. लाखो लोकांना देश सोडायचा आहे. तालिबाननं अफगाणी नागरिकांना सुरक्षेचं वचन दिलं आहे. मात्र नागरिकांचा त्यांच्या शब्दावर विश्वास नाही. कोणत्याही मार्गानं देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू आहे. काबुलच्या विमानतळावरील गर्दी कायम आहे. दिवसागणिक गर्दी वाढत आहे. 

तालिबानने भारतातून आयात आणि निर्यातीवर बंदी घातली-

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने भारतातून आयात आणि निर्यातीवर बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) चे महासंचालक डॉ.अजय सहाय यांच्या मते, तालिबानने सध्या पाकिस्तानच्या पारगमन मार्गांवरून सर्व माल वाहतुकीवर बंदी घातली आहे. डॉ. सहाय म्हणाले की, भारत अफगाणिस्तानला साखर, औषधी, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवर निर्यात करतो. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून सुकामेवा आणि कांदा यासारख्या वस्तू आयात केल्या जातात. 

Read in English

Web Title: Afghanistan's defense minister has begun mobilizing people opposed to the Taliban.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.