अर्थव्यवस्था कमकुवत नसून देशात क्रांती आली आहे; अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 04:05 PM2023-07-09T16:05:29+5:302023-07-09T16:05:48+5:30
Afghanistan Crisis : देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असल्याच्या चर्चो खोट्या असल्याचे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी सांगितले आहे.
Afghanistan Economic Crisis : अलीकडच्या काळात लागू केल्यामुळे आपल्या महिलाविरोधी धोरणांमुळे तालिबानशासित अफगाणिस्तान चर्चेत आहे. अफगाणिस्तानवर जगभरातून टीका होत आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठे विधान केले आहे.
टोलोन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानचे विद्यमान परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी दावा केला आहे की, सध्या अफगाणिस्तानमध्ये देशाची अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक कमकुवत झाल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. पण यात काहीही तथ्य नाही. देशातील पैसा युद्ध पुरवठा आणि शस्त्रास्त्रांऐवजी विविध प्रकल्पांसाठी वापरला जात आहे. त्यामुळे पूर्वी चाळीस लाख व्यसनाधीनांना ड्रग्ज देणे यावर अर्थव्यवस्था चालत असल्याचे मानले जात होते. पण आता तसे राहिले नाही.
जगाने घातलेल्या निर्बंधांचा काहीही परिणाम नाही - मुत्ताकी
तसेच यापूर्वीची अर्थव्यवस्था देशासाठी फायदेशीर नव्हती. पण आता देशात क्रांती होत असून सध्याच्या अफगाणिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय समुदायाने लादलेल्या निर्बंधांमुळे आणि दबावामुळे देशाचे चलन स्थिर राहिले आहे, अशी कबुली परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून देशाची अर्थव्यवस्था वाढेल, असेही ते म्हणाले.
"अफगाणिस्तानातील नागरिकांच्या पैशाला स्थिरता दिली आहे, सर्व सीमा खुल्या आहेत, कोणीही कुठेही व्यापार करू शकतो, जागतिक स्तरावर निर्बंध आणि दबाव असतानाही अफगाणिस्तानसाठी ही एक मोठी कामगिरी आहे. मात्र, काही जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानवर निर्बंध लादल्याने देशात आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे आगामी काळात संकटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत सरकारला आपली परराष्ट्र धोरणे सुधारावी लागतील", असेही परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले.