चीनबरोबरचे सर्व आर्थिक संबंध तोडा, युरोप अन् अमेरिकेनंतर 'या' देशांमध्ये होतोय कडाडून विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 06:27 PM2020-04-25T18:27:48+5:302020-04-25T18:45:34+5:30
नैरोबी : संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू असतानाच, यूरोप आणि अमेरिकेतच नव्हे, तर अफ्रिकन देशांमध्येही चीनला जबरदस्त विरोध सुरू झाला ...
नैरोबी : संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू असतानाच,यूरोप आणि अमेरिकेतच नव्हे, तर अफ्रिकन देशांमध्येही चीनला जबरदस्त विरोध सुरू झाला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वच आफ्रिकन देश आता चीनकडून देण्यात आलेला निधी, तसेच त्याच्या गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे, यासंदर्भात बारकाईने अभ्यास करू लागले आहेत. कोरोना महामारीचा सामना करत असलेले स्थानिक लोक आता संपूर्ण आफ्रिकेत चीन विरोधात निदर्शने करत आहेत. यावेळी, चीनबोरबरचे सर्व आर्थिक व्यवहार संपुष्टात आणावेत, कारण चीन देत असलेला निधी फार महागात पडत असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे.
CoronaVirus : मजुरांना घरी पाठवण्यासंदर्भात तयार होतोय 'बिग प्लॅन', पण केंद्र सरकार घालू शकतं अशी अट
आफ्रिकन देशांमध्ये चीनचा कडातून विरोध होत आहे. येथे काम करणाऱ्या चीनी नागरिकांसोबत येथील स्थानिक लोक आता शत्रूप्रमाणे वागत आहेत. नुकतेच, कोरोना संकटात चीनमध्येही आफ्रिकन लोकांना चांगली वागणूक दिली जात नसल्याचे तसेच भेदभाव केला जात असल्याचे वृत्त समोर आले होते. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये मूळच्या आफ्रिकन लोकांविरोधात विरोधाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे अधिकांश आफ्रिकन लोकांना हॉटेल आणि त्यांच्या घरमालकांनी बाहेर काढले होते. यामुळे ते बेघर झाले होते. यासंदर्भात सीएनएनचा एक रिपोर्टदेखील समोर आला होता. यामुळे चीन आणि आफ्रिकेदरम्यान तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.
फक्त 7 रुपयांमध्ये दिवसाला 3GB डेटा, फ्री कॉलिंगचाही फायदा; असे आहेत 'या' तीन कंपन्यांचे 'बिग प्लॅन'
या घटनांमुळे चीन आणि आफ्रिकन देशांमधील संबंधांवर मोठा परिणाम झाला आहे. आफ्रिकन देशांशी व्यापार आणि व्यवसायिक संबंध प्रस्थापित करण्यात अनेक दशके लागली होती. 2019मध्ये चीन आणि आफ्रिका यांच्यात 208 अब्ज डॉलरचा व्यवसाय झाला होता. हळू-हळू चीनने आफ्रिकन देशांमध्ये अनेक इंफ्रास्ट्रक्चर प्रकल्पांच्या निर्मितीचीही सुरुवात केली होती. यासंदर्भात अमेरिकेने आफ्रिकन देशांना सावधही केले होते आणि याला चायनीज डेबिट ट्रॅप डिप्लोमसी, असेही संबोधले होते.