"मला जन्माला का घातलं?", आईची प्रसुती केलेल्या डॉक्टरला 'तिने' कोर्टात खेचलं, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 03:24 PM2021-12-02T15:24:45+5:302021-12-02T15:29:46+5:30

Evie Toombes filed case against the doctor : एका मुलीने आता आपल्या जन्मानंतर तब्बल 20 वर्षांनी आपल्या जन्माच्या वेळी आईची प्रसुती केलेल्या डॉक्टरलाच कोर्टात खेचल्याची घटना समोर आली आहे.

after 20 years of birth evie toombes filed case against the doctor who delivered her mother | "मला जन्माला का घातलं?", आईची प्रसुती केलेल्या डॉक्टरला 'तिने' कोर्टात खेचलं, नेमकं काय घडलं?

"मला जन्माला का घातलं?", आईची प्रसुती केलेल्या डॉक्टरला 'तिने' कोर्टात खेचलं, नेमकं काय घडलं?

Next

कधी भांडणात तर कधी मजा मस्करीत 'मला जन्माला का घातलं?' असा प्रश्न हा हमखास अनेक जण विचारतात. पण यामुळे जर कोणी कोणाला कोर्टात खेचल्याचं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका मुलीने आता आपल्या जन्मानंतर तब्बल 20 वर्षांनी आपल्या जन्माच्या वेळी आईची प्रसुती केलेल्या डॉक्टरलाच कोर्टात खेचल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही केस मुलगी जिंकली आहे. पण यामागचं कारण मात्र गंभीर आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 2001 मध्ये एवी टूम्ब्सचा जन्म झाला. त्यानंतर आता 20 वर्षीय एवीने आपल्या जन्माच्या वेळी आईची प्रसुती करणाऱ्या तसेच आई गरोदरपणात ज्या डॉक्टरकडे उपचार घेत होती त्या डॉक्टरविरोधात न्यायालयात दाद मागितली. मला जन्माला का घातलं? असा सवाल या मुलीने उपस्थित केला आहे. या मुलीला स्पाईना बिफिडा हा त्रास आहे. यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एवीचा दावा आहे की, जर तिच्या आईच्या डॉक्टरने आईला वेळीच योग्य सल्ला दिला असता तर तिचा जन्म झाला नसता.

जन्माच्या 20 वर्षांनंतर मुलीने आईच्या डॉक्टरविरोधात घेतली कोर्टात धाव

एवीने दावा केला की जर तिच्या आईचे डॉक्टर फिलिप मिशेल यांनी तिच्या आईला फॉलिक एसिड सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला दिला असता ज्यामुळे बाळाच्या पाठीच्या कण्यातील दोषाचा धोका कमी झाला असता, तर तिची गर्भधारणा होण्यास उशीर झाला असता आणि एवीचा जन्म झाला नसता. न्यायाधीश रोसालिंड को क्यूसी यांनी एवीच्या केसचे समर्थन केले आणि लंडन उच्च न्यायालयातील महत्त्वपूर्ण निकालात तिच्या आईला योग्य सल्ला दिला असता तर तिने गर्भधारणा टाळली असती असं म्हटलं आहे. 

नुकसान भरपाई मिळवण्याचा एवीचा हक्क स्पष्ट करत न्यायाधीशांनी आपला निर्णय सुनावला आहे. तसेच एवीला प्रकरणात लाखोंची नुकसान भरपाईसुद्धा मिळाली आहे. "मला सल्ला देण्यात आला होता की जर मी पूर्वी चांगला आहार घेतला तर मला फॉलिक एसिड घेण्याची गरज नाही" एवीच्या दाव्याला पाठिंबा देत तिच्या आईने न्यायालयात असं सांगितलं आहे. एका हिंद वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: after 20 years of birth evie toombes filed case against the doctor who delivered her mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.