चीनचं पुन्हा मोठं षडयंत्र?; श्रीलंका दौरा सोडून नेपाळचे पंतप्रधान भारतात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:36 PM2022-03-24T12:36:31+5:302022-03-24T12:36:59+5:30
देउबा १ एप्रिल ते ३ एप्रिल या कालावधीत भारत दौऱ्यावर असतील, असं रिपोर्टमध्ये सांगितले आहे
काठमांडू – नेपाळमध्येभारत(India) आणि अमेरिकेच्या(US) वाढत्या प्रभावामुळे घाबरलेल्या चीननं पुन्हा एकदा मोठं षडयंत्र रचण्याची तयारी केला आहे. अमेरिकेच्या MCC प्रोजेक्टला मुजंरी दिल्यानंतर आता चीनचे परराष्ट्र मंत्री नेपाळ दौऱ्यावर जात आहेत. तर माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सीपीएन पार्टीचं शिष्टमंडळ बीजिंगला पोहचले आहे. त्यामुळे चीन केपी ओली आणि त्यांचे विरोधी यांच्यात तडजोड करण्याचा प्रयत्न करत आहे.
दुसरीकडे चीन(China) अंतर्गत विषयावर दखल देत असल्याने आता नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा (Sher Bahadur Deuba) श्रीलंका दौरा न करता भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. नेपाळी वृत्तपत्र काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, नेपाळचे पंतप्रधान देउबा १ एप्रिल रोजी ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर रवाना होणार आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या नेपाळ दौऱ्यानंतरच देउबा भारत दौऱ्यावर येत आहेत. भारताच्या दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेऊन नेपाळचे पंतप्रधान बिमस्टेकच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी श्रीलंकेला जात नाहीत. ते आता या सभेला व्हर्चुअल सहभागी होणार आहेत.(Nepal PM on India Tour)
४ वर्षांनी पहिल्यांदा नेपाळचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर
देउबा १ एप्रिल ते ३ एप्रिल या कालावधीत भारत दौऱ्यावर असतील, असं रिपोर्टमध्ये सांगितले आहे. त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी नवी दिल्ली भेटीचे निमंत्रण दिले होते. पंतप्रधान झाल्यानंतर देउबा यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. या प्रवासादरम्यान सीमापार रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत करार होऊ शकतो, असे मानले जात आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या काठमांडू दौऱ्यानंतरच देउबा यांचा भारत दौरा होणार आहे. नेपाळच्या पंतप्रधानांची ४ वर्षानंतरची ही पहिलीच भारत भेट आहे. याआधी ओली भारतात आले होते पण त्यांच्या कार्यकाळात भारतासोबतचे संबंध अत्यंत वाईट झाले.
नेपाळच्या संसदेने अमेरिकेच्या एमसीसीला मदत मंजूर केल्यानंतर चीन संतापला आहे. चीनचा असा विश्वास आहे की अमेरिकेने आपला बेल्ट अँड रोड प्रकल्प कमी करण्यासाठी ही सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या मदतीला मंजुरी दिल्यानंतर आता बीआरआय प्रकल्प सुरू करण्यासाठी चीनचा दबाव असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, ओली यांच्या पक्षाचे शिष्टमंडळ चीनला पोहोचले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष विष्णू प्रसाद पौड्याल यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ आहे. ओली आणि प्रचंड यांच्या गटात एक करार होऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात होती, ज्याला चीनही अनेक दिवसांपासून अनुकूलता देत आहे. असे झाल्यास देउबा सरकार अडचणीत येईल.