तब्बल ४० वर्षांनंतर मिळाले टपालाद्वारे पार्सल
By admin | Published: September 19, 2015 02:23 AM2015-09-19T02:23:24+5:302015-09-19T08:32:22+5:30
मेलबोर्न टेनिस क्लबने १९७० मध्ये मागविलेले पार्सल आॅस्ट्रेलियाच्या सरकारी टपाल खात्याने तब्बल ४० वर्षांनी त्याना त्यावेळी दिलेल्या पत्त्यावर पोहोचते केले, असे शिन्हुआने न्यूज कॉर्पच्या हवाल्याने
मेलबोर्न : मेलबोर्न टेनिस क्लबने १९७० मध्ये मागविलेले पार्सल आॅस्ट्रेलियाच्या सरकारी टपाल खात्याने तब्बल ४० वर्षांनी त्याना त्यावेळी दिलेल्या पत्त्यावर पोहोचते केले, असे शिन्हुआने न्यूज कॉर्पच्या हवाल्याने शुक्रवारी वृत्त दिले. क्लबचे बोधचिन्ह शिवण्यासाठीच्या साहित्याचे हे पार्सल होते. ते क्लबला मिळाले तेव्हा ते खूपच खिळखिळे झाले होते. आॅस्ट्रेलिया पोस्टच्या कार्यालयात टपालाचे वर्गीकरण करताना ते मशिनरीच्या मागे पडले. या कार्यालयाचे नुकतेच स्थलांतर झाले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
हे पार्सल मिळाले यावर माझा विश्वासच बसला नाही. त्याचा आम्हाला पूर्णपणे विसर पडला होता. ही बाब १९७५ मधील असावी असा आमचा अंदाज होता व त्याची मागणी मीच केली असावी. कारण त्यावर माझाच पत्ता होता, असे क्लब समितीच्या माजी सदस्य इरेनी गॅरेट म्हणाल्या. लिफाफ्यावरील नाव व पत्ता ४० वर्षांनंतरही वाचता येतो. गॅरेट यांचा या क्लबशी आज काहीही संबंध नाही; परंतु त्यांनी आॅस्ट्रेलिया टपाल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या ‘कधीच नाही त्यापेक्षा उशिरा का असेना सेवा देण्याच्या’ मानसिकतेचे आभार मानले असल्याचे वृत्तात म्हटले आहे.