9/11 नंतर अल-काईदा कैद्यांचा केला होता छळ
By admin | Published: August 3, 2014 02:17 AM2014-08-03T02:17:26+5:302014-08-03T02:17:26+5:30
11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अल-काईदाच्या संशयित हस्तकांचा सीआयए छळ करीत असल्याचे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना ठाऊक होते.
Next
वॉशिंग्टन : 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अल-काईदाच्या संशयित हस्तकांचा सीआयए छळ करीत असल्याचे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना ठाऊक होते. दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही काही अशा गोष्टी केल्या ज्या चुकीच्या होत्या, असे सांगून ओबामा यांनी संशयितांचा छळ झाल्याची कबुली दिली.
अमेरिकी प्रशासन लवकरच सिनेटला एक अहवाल सादर करणार असून यात 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर सीआयए एजंटांनी संशयित दहशतवाद्यांचा कशाप्रकारे छळ केला याची माहिती असेल. ट¦ीन टॉवर पाडल्यानंतर नागरिक घाबरून गेले होते. सर्वाना पुन्हा असे हल्ले होण्याच्या भयगंडाने पछाडले होते. आमच्या गुप्तचर संघटना व पोलीस यंत्रणोसह राष्ट्रीय सुरक्षा दलांना हा भयगंड दूर करण्याचा मोठा दबाव होता. मात्र, असे असले तरी आम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. काही चुकीच्या गोष्टी घडत असल्यानेच राष्ट्राध्यक्ष बनताच मी सर्वात आधी चौकशीच्या काही पद्धतींवर बंदी घातली, असे ओबामा म्हणाले. (वृत्तसंस्था)
च्दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने अल-काईदाच्या अनेक संशयित हस्तकांना अटक केली होती. त्यांना ग्वाटेमाला बे येथील तुरुंगात डांबण्यात आले होते. या तुरुंगात कैद्यांचा अनन्वित छळ होत असल्याचे आरोप झाले होते. मात्र अमेरिकेने या आरोपांचा इन्कार केला होता.