अमेरिकेनंतर आणखी एका देशात...! चिन्यांना मागे टाकून भारतीय राष्ट्राध्यक्ष पदाच्या जवळ, पुढील आठवड्यात निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 09:37 AM2023-08-28T09:37:35+5:302023-08-28T09:38:10+5:30
चिनी वंशाच्या एनजी कोक सॉंग आणि टॅन किन लियान या दोन उमेदवारांविरुद्ध शनमुगरत्नम यांना लढावे लागत आहे.
सिंगापूरमध्ये १ सप्टेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये अनिवासी भारतीय थर्मन शनमुगरत्नम यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. सिंगापूरला यावेळी गैर चिनी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनमुगरत्नम यांच्यानुसार सिंगापुरवाले जाती पातीपेक्षा काम पाहतात असा दावा त्यांनी केला आहे.
चिनी वंशाच्या एनजी कोक सॉंग आणि टॅन किन लियान या दोन उमेदवारांविरुद्ध शनमुगरत्नम यांना लढावे लागत आहे. सिंगापूरमध्ये ६० लाख लोकसंख्या आहे. यापैकी ७ टक्के लोक हे भारतीय आहेत, तर ७४ टक्के लोकसंख्या ही चिनी आहे.
शनमुगरत्नम यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५७ रोजी सिंगापूर येथे झाला होता. त्यांचे आजोबा तामिळनाडूतून स्थलांतरित होऊन सिंगापूरमध्ये स्थायिक झाले होते. थर्मन यांच्या वडिलांचे तिथे फार मोठे काम आहे. ते वैद्यकीय शास्त्रज्ञ होते. सिंगापूरमध्ये पॅथॉलॉजीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते.
शनमुगरत्नम हे स्वत: केंब्रिजमधून अर्थशास्त्रज्ञ झाले आहेत. सिंगापूरचे 'पॉलिसी मेकर' म्हणून त्यांचे काम आहे. ग्लोबल फोरममध्ये सिंगापूर आणि भारतासारख्या देशांबद्दल बोलण्यासाठी ते ओळखले जातात. चीन-अमेरिका या दोन्ही महासत्तांनी आपणच सर्वोत्कृष्ट असल्याचा अहंकार सोडण्याची गरज आहे. विकसनशील देश हे खूप महत्त्वाचे आहे हे त्यांना कळायला हवे, अशी त्यांची भुमिका आहे.
जर थर्मन यांनी निवडणूक जिंकली तर ते सिंगापूरमधील तिसरे भारतीय वंशाचे राष्ट्राध्यक्ष असतील. 1981 मध्ये संसदेत निवडून आलेले देवेन नायर राष्ट्रपती झाले. एस. आर. नाथन यांनी 1999 ते 2011 अशी 11 वर्षे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांची बिनविरोध निवड झाली होती.