अभिनंदन यांना पकडल्यानंतर लष्करप्रमुख बाजवा बैठकीत भीतीने थरथर कापत होते; खासदाराची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 06:32 AM2020-10-30T06:32:34+5:302020-10-30T06:34:05+5:30

Pakistan News : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली नसती तर भारत पाकिस्तानवर हवाई हल्ले करण्याच्या तयारीत होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाझ) पक्षाचे खासदार अयाझ सादिक यांनी केला  आहे.

After arresting Abhinandan, Army Chief Bajwa was trembling with fear at the meeting; MP information | अभिनंदन यांना पकडल्यानंतर लष्करप्रमुख बाजवा बैठकीत भीतीने थरथर कापत होते; खासदाराची माहिती

अभिनंदन यांना पकडल्यानंतर लष्करप्रमुख बाजवा बैठकीत भीतीने थरथर कापत होते; खासदाराची माहिती

Next

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली नसती तर भारत पाकिस्तानवर हवाई हल्ले करण्याच्या तयारीत होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाझ) पक्षाचे खासदार अयाझ सादिक यांनी केला  आहे. या माहितीला भारताचे माजी  हवाई दलप्रमुख बिरेंदरसिंग धनोआ यांनी दुजोरा दिला आहे. 

फॉरवर्ड ब्रिगेड होते हल्ल्याचे लक्ष्य : धनोआ
वर्धमान यांची पाकने मुक्तता केली नसती तर त्या देशाच्या फॉरवर्ड ब्रिगेडवर  हवाई हल्ले चढविण्याची योजना भारताने आखली होती, असे माजी हवाई दलप्रमुख बिरेंदरसिंग धनोआ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी पार्लमेंटमध्ये यासंदर्भात देण्यात आलेली माहिती खरी आहे, असेही त्यांनी सांगितले.  

बालाकोट हल्ल्याद्वारे भारताने दिले होते उत्तर
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे जनमानस संतप्त झाले. केंद्र सरकारने या हल्ल्याची गंभीर दखल घेत २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानातील खैबर पख्तनख्वा या प्रांतातील बालाकोट या ठिकाणी असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण छावण्यांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा न ओलांडता भारतीय हवाई दलाने ही कामगिरी पार पाडली होती.  

नेमका दावा काय केला?
संभाव्य हवाई हल्ल्यासंदर्भात परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी  यांनी घेतलेल्या बैठकीत भीतीने गाळण उडालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे पाय लटपटत होते, असा दावाही सादिक यांनी केला आहे. 

Web Title: After arresting Abhinandan, Army Chief Bajwa was trembling with fear at the meeting; MP information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.