बॉम्बच्या धमकीनंतर तुर्की विमान कॅनडाकडे वळविले

By admin | Published: November 22, 2015 11:58 PM2015-11-22T23:58:33+5:302015-11-22T23:58:33+5:30

न्यूयॉर्कहून इस्तंबूलकडे जाणारे तुर्कस्तान एअरलाईन्सचे न्यूयॉर्कहून इस्तंबूलकडे जाणारे विमान कॅनडाकडे वळविण्यात आले. तथापि, या विमानात कोणत्याही प्रकारची स्फोटके सापडली नाहीत.

After the bomb threat, the Turkish aircraft moved to Canada | बॉम्बच्या धमकीनंतर तुर्की विमान कॅनडाकडे वळविले

बॉम्बच्या धमकीनंतर तुर्की विमान कॅनडाकडे वळविले

Next

ओटावा : न्यूयॉर्कहून इस्तंबूलकडे जाणारे तुर्कस्तान एअरलाईन्सचे न्यूयॉर्कहून इस्तंबूलकडे जाणारे विमान कॅनडाकडे वळविण्यात आले. तथापि, या विमानात कोणत्याही प्रकारची स्फोटके सापडली नाहीत.
रॉयल कॅनेडियन माऊंटडे पोलिसांनी सांगितले की, या विमानात २६५ प्रवासी आणि कर्मचारी होते. बॉम्ब ठेवण्याच्या धमकीनंतर ते हॅलिफॅक्स स्टॅनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरले. तेथे विमानाची झडती घेण्यात आली असता कोणत्याही प्रकारचा बॉम्ब आढळून आला नाही. त्यानंतर ते विमान गंतव्यस्थळी रवाना झाले.
बेल्जियममध्ये संशयितांचा शोध
ब्रुसेल्स : बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी सर्व सार्वजनिक वाहतूक बंद असून, पोलीस आणि सैनिकांना रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. पॅरिसमध्ये १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यामागील ‘संशयितांचा’ कसून शोध सुरू आहे. पॅरिसवरील हल्ल्यानंतर निसटलेल्या बेल्जियम वंशाचा सालेह आबेदसलाम याचाच शोध चालू आहे.

Web Title: After the bomb threat, the Turkish aircraft moved to Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.