विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही! पंजशीरवरील कब्जानंतर तालिबानची धमकी; अमरुल्लाह देश सोडून पळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 03:28 PM2021-09-06T15:28:27+5:302021-09-06T15:30:30+5:30

खरे तर तालिबानच्या वेगवेगळ्या गटांत सत्ता वाटपावरून मतभेद आहेत. यामुळेच कदाचीत अंतरिम सरकार स्थापन केले जात आहे. यामुळे, कायमस्वरूपी सरकार स्थापनेसाठीही वेळ दिला जाऊ शकेल.

After capture panjshir Taliban says we will not spare resurgents, amrullah saleh fled | विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही! पंजशीरवरील कब्जानंतर तालिबानची धमकी; अमरुल्लाह देश सोडून पळाले

विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही! पंजशीरवरील कब्जानंतर तालिबानची धमकी; अमरुल्लाह देश सोडून पळाले

Next

तालिबानने पंजशीर खोऱ्यावर कब्जा केल्यानंतर, अफगाणिस्तानातील त्यांच्या सत्तेविरोधात बंड करणाऱ्यांना थेट आणि कठोर शब्दात इशारा दिला आहे. आपल्या सत्तेविरोधात कुणी बंड केलेच तर त्याला सोडले जाणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे. याच बरोबर, अफगाणिस्तानमध्ये सध्या केवळ अंतरिम सरकारच स्थापन होईल. यानंतर बदल केले जाऊ शकतात, असेही तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. (After capture panjshir Taliban says we will not spare resurgents, amrullah saleh fled)

खरे तर तालिबानच्या वेगवेगळ्या गटांत सत्ता वाटपावरून मतभेद आहेत. यामुळेच कदाचीत अंतरिम सरकार स्थापन केले जात आहे. यामुळे, कायमस्वरूपी सरकार स्थापनेसाठीही वेळ दिला जाऊ शकेल.

रॉयटर्सने तालिबानच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, पंजशीर खोऱ्यात बंडखोरांचे नेतृत्व करणारे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी देश सोडून पलायन केले आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने दावा केला आहे की अमरुल्ला सालेह ताजिकिस्तानला पळून गेले आहेत. तत्पूर्वी, काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांत सांगण्यात आले आहे, की सालेह एका गुप्त ठिकाणावरून लढ्याचे नेतृत्व करत आहेत. याशिवाय, पंजशीरचे आणखी एक नेते अहमद मसूद यांनी ट्विट करून सांगितले आहे, की ते सुरक्षित आहेत. 

तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार!

मात्र, अद्याप सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सालेह यांनी आपले लोकेशन आणि पंजशीरमधील परिस्थिती, यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. यातच, आपण अफगाणिस्तानातील परिस्थिती सामान्य करण्याच्या प्रयत्नात आहोत, असे तालिबानने म्हटले आहे. एवढेच नाही, तर काबूलमधून लवकरच इतर देशांसाठीी विमान सेवा पून्हा सुरू होईल. यामुळे अफगाणिस्तानात अडकलेल्यांनाही दिलासा मिळेल. तसेच, पुन्हा एकदा अफगाणिस्तानचा जगासोबतचा संबंध पूर्वत होईल.

Web Title: After capture panjshir Taliban says we will not spare resurgents, amrullah saleh fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.