China Coronavirus : चीनमध्ये कोरोना व्हायरसनंतर आता बर्ड फ्लूचा धोका; 4500 कोंबड्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 11:40 AM2020-02-03T11:40:28+5:302020-02-03T11:44:12+5:30
एका पोल्ट्री फार्ममधील तब्बल 4500 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
बीजिंग - चीनमध्येकोरोना व्हायरसमुळे 361 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तर 9692 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिलिपिन्समध्ये कोरोना व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. कोरोना व्हायरसनंतर आता चीनला बर्ड फ्लूचा धोका आहे.
एका पोल्ट्री फार्ममधील तब्बल 4500 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हुनान प्रांतातील शुआंगक्विंग जिल्ह्यात एकाचवेळी हजारो कोंबड्याचा मृत्यू झाल्याने बर्ड फ्लू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोंबड्यांचा मृत्यू झाला असला तरी अद्याप कोणत्याही व्यक्तीमध्ये एच5एन1 हे व्हायरस आढळले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हुबेई प्रांतच्या स्थानिक आरोग्य विभागाने सोमवारी याची माहिती दिली आहे.
Coronavirus toll rises to 361 in China
— ANI Digital (@ani_digital) February 3, 2020
Read @ANI Story | https://t.co/Vcjpp525uipic.twitter.com/zLmr38eTqx
शयोयांग शहरातील शुआंगक्विंग जिल्ह्यातील पोल्ट्री फार्ममध्ये 7,850 कोंबड्या आहेत. त्यातील 4500 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच संसर्ग झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत 17,828 कोंबड्यांना मारले आहे. चीनमधील लोक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना घरातून बाहेर फेकत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. प्राण्यांपासून हा व्हायरस पसरत असल्याची माहिती सगळीकडे पसरल्याने लोक प्राण्यांना घरातून बाहेर काढत आहेत.
China Coronavirus : धक्कादायक! चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने पाळीव प्राण्यांना घराबाहेर फेकलंhttps://t.co/XthY3CHvPm#cornonavirus#Corona
— Lokmat (@MiLOKMAT) February 3, 2020
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढल्याच्या घटना घडल्या आहेत. याचे अनेक धक्कादायक फोटो देखील समोर आले आहेत. फोटोमध्ये पाळीव प्राणी रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडले आहेत. चीनमधील लोक आपल्या इमारतीतून कुत्रा, मांजर यासारखे पाळीव प्राणी फेकून देत असल्याचं सांगितलं जात आहे. शांघाईमध्ये 5 मांजरींना घरातून बाहेर फेकून दिले आहे. या प्राण्यांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले आढळले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus News: अवघ्या 8 दिवसांत बांधलं 1000 बेड्सचं हॉस्पिटल; चीनचा 'चमत्कार'https://t.co/2PzIIRVifO#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) February 3, 2020
चीनमधलं वुहान शहर या व्हायरसचं केंद्रबिंदू असून, चीनमध्ये कोरोना व्हायरसनं बाधित असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चीनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून, तिकडची सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. चीन सरकारने एका आठवड्यात कोरोना व्हायरसबाधित रुग्णांसाठी 1000 बेड्सच हॉस्पिटल निर्माण केलं आहे. येत्या एक-दोन दिवसांत या हॉस्पिटलमधून उपचार मिळण्यास सुरुवात होणार आहे. या हॉस्पिटलचं वेगानं काम सुरू असून, ते जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. 23 जानेवारीला या हॉस्पिटलच्या निर्माणाचं काम हाती घेण्यात आलं होतं. चीन ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कनं या हॉस्पिटलच्या निर्माणाचं सीसीटीव्ही फुटेज जारी केलेलं आहे. हॉस्पिटल तयार होत असलेल्या ठिकाणी लायनिंग सामग्री ठेवणाऱ्या लॉरी दिसत आहेत. तसेच अनेक जण खोदकाम करत असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळतंय. या हॉस्पिटलचा बेस तयार झालेला दिसत असून, काम जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
...अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग
महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा नाटकी होता; भाजपा खासदाराचे वक्तव्य
China Coronavirus : धक्कादायक! चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने पाळीव प्राण्यांना घराबाहेर फेकलं
Coronavirus News: चीनमधून ३२३ भारतीय परतले; दोन मराठी मुलांची मात्र परवड
जामिया विद्यापीठाजवळ पुन्हा गोळीबार, गेल्या चार दिवसातील तिसरी घटना