कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर महिलांची बोटे छाटण्याची प्रथा
By admin | Published: April 30, 2017 12:41 AM2017-04-30T00:41:07+5:302017-04-30T00:41:07+5:30
पापुआ न्यू गिनी बेटावर राहणाऱ्या दानी जमातीचे लोक विचित्र परंपरेचे पालन करतात. कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त करण्यासाठी ते कुटुंबातील महिलांच्या हाताची
पापुआ न्यू गिनी बेटावर राहणाऱ्या दानी जमातीचे लोक विचित्र परंपरेचे पालन करतात. कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त करण्यासाठी ते कुटुंबातील महिलांच्या हाताची काही बोटे छाटतात. या वेदनादायी आणि अमानवी प्रथेमुळे महिलांचे जीवन खडतर बनते. कुटुंबातील महिलांची बोटे कापल्यामुळे मृताच्या आत्म्याला शांती लाभते, अशी या लोकांची समजूत आहे. अधिक रक्तस्राव होऊ नये म्हणून बोटे तोडण्यापूर्वी ती दोरीने आवळून बांधली जातात. त्यानंतर त्यावर कुऱ्हाड चालविली जाते. कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच या महिलांवर बोटे गमावण्याचे दुहेरी संकट कोसळते. हाताची बोटे छाटली गेल्यामुळे दैनंदिन काम करताना महिलांना अनेक अडचणी येतात; मात्र परंपरेच्या नावाखाली ही प्रथा आजही पाळली जाते. सरकारने अलीकडेच या अमानवी परंपरेवर बंदी घातली असली तरी आजही काही लोक या प्रथेचे पालन करताना दिसतात. कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूमुळे बोटे गमवावी लागलेल्या अनेक महिला तुम्हाला येथे दिसून येतील.