हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करणे चुकलेच, मोदींच्या दणक्यानंतर पाक नमले

By admin | Published: September 28, 2014 11:58 AM2014-09-28T11:58:02+5:302014-09-28T11:58:02+5:30

भारत - पाकमधील सचिव स्तराची बैठक होत असतानाच काश्मीरमधील हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करण्याची वेळ चुकलीच अशी कबुली पाकिस्तानचे सुरक्षा व परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे.

After discussing with the Hurriyat leaders, we got Pakistan after Modi's campaign | हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करणे चुकलेच, मोदींच्या दणक्यानंतर पाक नमले

हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करणे चुकलेच, मोदींच्या दणक्यानंतर पाक नमले

Next
>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २८ - संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दहशवादाच्या सावटाखाली पाकशी चर्चा करता येणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला सुनावल्यानंतर पाकने अखेरीस नमती भूमिका घेतली आहे. भारत - पाकमधील सचिव स्तराची बैठक होत असतानाच काश्मीरमधील हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करण्याची वेळ चुकलीच अशी कबुली पाकिस्तानचे सुरक्षा व परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे. 
न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीरप्रश्न उपस्थित केला होता. यावर शनिवारी नरेंद्र मोदींनी चोख प्रत्युत्तर दिले होते. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत काश्मीर प्रश्न उपस्थित करुन काही होणार नाही असे खडे बोल नरेंद्र मोदींनी सुनावले होते. पाकशी द्विपक्षीय चर्चा करुन मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत. मात्र दहशतवादाच्या सावटाखाली चर्चा शक्य नाही अशी परखड भूमिका मोदींनी मांडली होती. तर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील काश्मीरमधील फुटीरवादी हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करुन पाकने द्विपक्षीय चर्चेवर पाणी फेरले असे स्पष्ट केले. 
भारताने चोख प्रत्युत्तर दिल्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्रधोरण विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यात अझीझ यांनी काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांशी चर्चा करणे चुकलेच अशी कबुली दिली. दोन्ही देशांमधील सचिवस्तराची बैठक होणार असतानाच पाकने हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करणे टाळायला हवे होते. चर्चा रद्द झाल्याने दोन्ही देशांमधील नवनियुक्त राष्ट्रप्रमुखांनी चर्चेला नव्याने सुरुवात करण्याची संधी दवडली असेही अझीझ यांनी स्पष्ट केले.  भारताने चर्चा रद्द केल्याची आम्हाला दुःख आहे. मात्र आता आम्ही पुन्हा चर्चेसाठी तयार असून आता भारत याविषयी सकारात्मक प्रतिसाद देईल का याकडे पाकचे लक्ष आहे असेही अझीझ यांनी नमूद केले. संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील मोदींच्या भाषणाचेही अझीझ यांनी कौतुक केले आहे. 

Web Title: After discussing with the Hurriyat leaders, we got Pakistan after Modi's campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.