माझ्या मर्जीविरोधात करण्यात आले बंदिवान, दुबईच्या राजकन्येने मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:32 IST2021-02-18T03:54:25+5:302021-02-18T06:32:45+5:30
Sheikha Latifa: शेखा लतिफा यांनी दुबईतून पळून जाण्याचा केलेला प्रयत्न मार्च २०१८ साली हाणून पाडण्यात आला होता. त्यानंतर आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार या व्हिडीओत लतिफा यांनी केली आहे.

माझ्या मर्जीविरोधात करण्यात आले बंदिवान, दुबईच्या राजकन्येने मांडली व्यथा
दुबई : माझ्या मर्जीविरोधात मला एका बंगल्यामध्ये बंदिवासात ठेवण्यात आले आहे, असा आरोप दुबईची राजकन्या शेखा लतिफा यांनी केला आहे. त्यांनी आपल्या निवेदनाचा एक व्हिडीओ गुप्तपणे चित्रीत केला व तो आता प्रसारमाध्यमांवर झळकला आहे.
शेखा लतिफा यांनी दुबईतून पळून जाण्याचा केलेला प्रयत्न मार्च २०१८ साली हाणून पाडण्यात आला होता. त्यानंतर आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार या व्हिडीओत लतिफा यांनी केली आहे. शेखा लतिफा या गेली तीन वर्षे कोणत्याही जाहीर कार्यक्रमांना दिसत नव्हत्या. त्यांनी या व्हिडीओ फितीत म्हटले आहे की, मला जिथे बंदी बनवून ठेवले आहे, त्या बंगल्याचे सौदी सरकारने जणू तुरुंगात रूपांतर केले आहे.
लतिफा यांच्या सुटकेसाठी प्रयत्न
दुबईच्या राजकन्या शेखा लतिफा यांनी दुबईतून पळून जाण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. मात्र त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लतिफा यांच्या स्थितीकडे लक्ष वेधले गेले होते. लतिफा यांची सुटका करावी, अशी मागणी काही मानवी हक्क संघटनांनी दुबईच्या राजाकडे केली होती.