गाझानंतर इस्रायलने वेस्ट बँकेकडे आपला मोर्चा वळवला; इस्रायली सैन्याची तीव्र कारवाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:06 IST2025-02-25T16:53:46+5:302025-02-25T17:06:05+5:30

Israel in West Bank: इस्रायली लष्कराच्या कारवाईमुळे पॅलेस्टिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

After Gaza, Israel shifts its focus to the West Bank; Israeli army takes strong action... | गाझानंतर इस्रायलने वेस्ट बँकेकडे आपला मोर्चा वळवला; इस्रायली सैन्याची तीव्र कारवाई...

गाझानंतर इस्रायलने वेस्ट बँकेकडे आपला मोर्चा वळवला; इस्रायली सैन्याची तीव्र कारवाई...

Israeli Operation in West Bank : गेल्या काही काळापासून इस्रायल आणि गाझामध्ये टोकाचा संघर्ष सुरू होता. पण, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझातून माघार घेतली. यामळे त्यांच्या नेतृत्वावर संपूर्ण इस्रायलमध्ये टीका होत आहे. दरम्यान, गाझामधील आपले ध्येय साध्य न झाल्याने इस्रायली सैन्य आता वेस्ट बँक वस्त्यांकडे वळाले आहे. गाझातील युद्धविरामानंतर इस्रायली सैन्य रणगाडे, बुलडोझर आणि इतर प्राणघातक शस्त्रांसह वेस्ट बँकमध्ये घुसले असून, परिसराची नासधूस करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या कारवाईमुळे पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी इस्रायलवर जोरदार टीका केली. इस्रायलला वेस्ट बँकवरील आपला कब्जा मजबूत करायचा असल्याची टीका पॅलेस्टिनने केली आहे. सध्या वेस्ट बँकमध्ये सुमारे 3 मिलियन पॅलेस्टिनी लष्करी राजवटीत राहतात. गाझा आणि लेबनॉनमधील लढाईनंतर, आता वेस्ट बँकमध्ये कारवाई करण्याचा नेतन्याहूंवर दबाव असल्याची माहिती आहे. त्यामुळेच ही कारवाई केली जात आहे. 

वेस्ट बँके भागात इस्रायली सैन्याच्या कारवायांमुळे जेनिन निर्वासित कॅम्प आणि वेस्ट बँकेच्या तुलकर्म शहरात राहणाऱ्या पॅलेस्टिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भीतीमुळे जेनिन निर्वासित कॅम्प आणि तुलकरम शहरातून सुमारे 40 हजार पॅलेस्टिनींनी आपली घरे सोडली आहेत. यामुळे इस्रायली सैन्याने रिकाम्या झालेल्या वस्त्यांचा ताबा घेतला असून, तेथे असलेले सर्व पाणी, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा नष्ट करत आहेत.

जेनिन आता जगण्यालायक नाही
विशेष म्हणजे, इस्रायली सैन्य गाझामधून युद्धविराम करारानुसार परतले, तेव्हा त्यांनी तेथील बहुतांश नागरी इमारती उद्ध्वस्त केल्या. यामुळे गाझामधील लोकांना आता तंबूत राहावे लागत आहे. तसेच, ते सर्व अन्न, पाणी आणि औषधांसाठी बाह्य मदतीवर अवलंबून आहेत. आता हीच परिस्थिती वेस्ट बँकेत आहे. पण, जेनिन आणि तुलकार्ममध्ये घुसलेल्या इस्रायली सैन्याला तिथल्या बंडखोरांच्या तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला आहे. 

Web Title: After Gaza, Israel shifts its focus to the West Bank; Israeli army takes strong action...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.