मृत मुलाची ओळख घेऊन त्याने २० वर्षे केली नोकरी, लग्नही उरकले, अखेर असे बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 07:24 PM2022-01-05T19:24:23+5:302022-01-05T19:25:37+5:30

Jara Hatke News: नोकरी मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या उचापती करत असतात. काहीजण खोटी प्रमाणपत्रे खोटे दाखले उभे करतात. मात्र ब्राझीलमधील एका व्यक्तीने नोकरी मिळवण्यासाठी जे काही केलं त्याबाबत वाचून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही.

After identifying the dead boy, he worked for 20 years, ended his marriage, and finally the bing burst | मृत मुलाची ओळख घेऊन त्याने २० वर्षे केली नोकरी, लग्नही उरकले, अखेर असे बिंग फुटले

मृत मुलाची ओळख घेऊन त्याने २० वर्षे केली नोकरी, लग्नही उरकले, अखेर असे बिंग फुटले

Next

वॉशिंग्टन - नोकरी मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या उचापती करत असतात. काहीजण खोटी प्रमाणपत्रे खोटे दाखले उभे करतात. मात्र ब्राझीलमधील एका व्यक्तीने नोकरी मिळवण्यासाठी जे काही केलं त्याबाबत वाचून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. या व्यक्तीने अफरातफर करून तब्बल २० वर्षे नोकरी केली. आलिशान आयुषय जगून घेतले. लग्नही केले. मात्र अखेरीस त्याचे बिंग फुटले.

या व्यक्तीची ओळख ४९ वर्षांचे रिकार्डो गुएडस अशी पटली आहे. तर रिकार्डो विल्यम एरिकसन लॉड या मुलाच्या ओळखीने नोकरी केली. रिकार्डोने अमेरिकेमध्येही घर खरेदी केले होते. विल्यमची केवळ चार वर्षांचा असतानाच मृत्यू झाला होता. विल्यम नावाचा हा मुलगा अमेरिकेतील अटलांटा येथे राहणारा होता.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार रिकार्डो याने लग्नसुद्धा विल्यम याच्या ओळखीवर केले होते. याबाबत एका स्थानिक वृत्तपत्राने सांगितले की, आता या प्रकरणात रिकार्डो याच्यावर कारवाई झाली आहे. त्याच्यावर चुकीची माहिती देऊन अमेरिकेचे नागरिकत्व घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिकार्डो याच्याविरोधात टेक्सास कोर्टात तक्रार देण्यात आली होती. ज्यामध्ये विल्यम एरिकसन याचा मृत्यू हा १९७९ मध्येच वॉशिंग्टनमध्ये त्याच्या पाचव्या वाढदिवसापूर्वी महिनाभर आधी झाल्याचे समोर आले होते.

तर रिकार्डो ९० च्या दशकामध्ये ब्राझीलमधून अमेरिकेत टुरिस्ट व्हिसावर आला होता. १९९८ मध्ये त्याने विल्यमच्या नावावर पासपोर्टसाठी अर्ज केला. आणि टेक्सासमधील लेक ह्युस्टन येथे राहण्यास सुरुवात केली. तेथे त्याने स्वत: चे घर घेतले होते.

फ्लाइट अटेंडंट रिकार्डो याला गेल्या वर्षी डिप्लोमॅटिक सिक्युरिटी सर्व्हिसशी संबंधीत लोकांनी गतवर्षी जॉर्ज बुश इंटरनॅशनल एअरपोर्टवर चौकशी करण्यात आली होती. तेव्हा ही अफरातफर उघड झाली. त्यानंतर त्याने चौकशीमध्ये सांगितले की, माझे स्वप्न तुटले आहे. रिकार्डो यांनी दीर्घकाळापर्यंत फ्लाइट अटेंडंटचे काम केले होते. त्याने युनायटेड एअरलाइनच्या ४० फ्लाइटमध्ये आपली सेवा दिली होती. मात्र आता कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले आहे.  

Web Title: After identifying the dead boy, he worked for 20 years, ended his marriage, and finally the bing burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.