म्यानमारनंतर आता टोंगामध्ये 7.1 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप, त्सुनामीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 20:23 IST2025-03-30T20:22:43+5:302025-03-30T20:23:01+5:30

म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपामुळे प्रचंड विध्वंस

After Myanmar, now a strong earthquake of 7.1 magnitude strikes Tonga, tsunami warning issued | म्यानमारनंतर आता टोंगामध्ये 7.1 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप, त्सुनामीचा इशारा

म्यानमारनंतर आता टोंगामध्ये 7.1 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप, त्सुनामीचा इशारा


Tonga Earthquake : थायलंड आणि म्यानमारनंतर आता आता टोंगामध्ये भीषण मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल होती, ज्यामुळे पॅसिफिक बेट राष्ट्राला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार सोमवारी सकाळी मुख्य बेटाच्या ईशान्येला सुमारे 100 किलोमीटर (62 मैल) अंतरावर भूकंप झाल्याचे यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने सांगितले.

टोंगा हा पॉलिनेशियामध्ये स्थित एक देश असून, 171 बेटांचा बनलेला आहे. या देशाची लोकसंख्या फक्त 100,000 आहे, त्यापैकी बहुतांश टोंगा मुख्य बेटावर राहतात. हे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यापासून 3,500 किलोमीटर (2,000 मैल) अंतरावर आहे. दरम्यान, या भूकंपानंतर पॅसिफिक त्सुनामी केंद्राने एक अलर्ट जारी केली आहे. यानुसार, धोकादायक लाटा भूकंपा केंद्राच्या 300 किलोमीटर (185 मैल) आत किनारपट्टीवर आदळू शकतात. 

म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपामुळे प्रचंड विध्वंस
शुक्रवारी म्यानमार आणि शेजारील थायलंडमध्ये शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील 1,700+ लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 3,400 लोक जखमी झाले. या भूकंपामुळे शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या, पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले.

Web Title: After Myanmar, now a strong earthquake of 7.1 magnitude strikes Tonga, tsunami warning issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.