इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 22:21 IST2024-10-23T22:20:55+5:302024-10-23T22:21:41+5:30
हसन नसराल्लाह ठार झाल्यानंतर हाशिम सफीद्दीन याला संघटनेचा प्रमुख करण्यात आले होते.

इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
लेबनान : लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाविरोधात इस्रायलला मोठे यश मिळाले आहे. हिजबुल्लाचा माजी प्रमुख नसराल्लाह याला ठार मारल्यानंतर आता इस्रायली लष्कराने संघटनेचा नवा प्रमुख हाशिम सफीद्दीन याचाही हवाई हल्ल्यात खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे.
हाशिम सफीद्दीन हिजबुल्लाचा प्रमुख बनल्यापासून बेपत्ता झाला होता. इस्रायली लष्कराने हवाई हल्ल्यात तो ठार झाल्याचा संशय होता, मात्र हिजबुल्लाने याबाबत कुठलीही माहिती दिली नव्हती. पण, आता जवळपास 3 आठवड्यानंतर हिजबुल्लाने हाशिम सफिदीनच्या हत्येची पुष्टी केली आहे.
हिजबुल्लाने बुधवारी जाहीर केले की, त्यांचा प्रमुख हाशिम सफीद्दीन हा इस्रायली हवाई हल्ल्यात मारला गेला. गेल्या महिन्यात इस्रायली हवाई हल्ल्यात ठार झालेल्या हसन नसराल्लाह याच्या जागी हाशिम सफीद्दीन याच्यावर संघटनेची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्याचाही इस्रायली लष्कराने खात्मा केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचे अनेक प्रमुख सदस्य मारले गेले आहेत.