नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 02:15 PM2024-09-29T14:15:10+5:302024-09-29T14:16:09+5:30
हाशिम सफीद्दीन मृत नसराल्लाहचा चुलत भाऊ असून, हिजबुल्लाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे.
बेरूत : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला (Hezbollah) संघटनेतील संघर्ष तीव्र झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी(दि.27) इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाह (Hassan Nasrallah Killed) याचा मृत्यू झाला. शनिवारी हे वृत्त जगभर पसरले. नसरल्लाह हिजबुल्ला शांत होईल, असे वाटत होते. पण, आता संघटनेला नवीन लीडर मिळाला आहे. हसीफ सफीद्दीन (Hashim Safieddin) याला हिजबुल्लाचा म्होरक्या बनवण्यात आले आहे. तो हसन नसराल्लाहचा चुलत भाऊ आहे. हसीफ हिजबुल्लाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असून, त्याचे शिया मुस्लिम चळवळीचे संरक्षक असलेल्या इराणशी खोल धार्मिक आणि कौटुंबिक संबंध आहेत.
सफीद्दीन अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या हिटलिस्टमध्ये
युनायटेड स्टेट्स आणि सौदी अरेबियाने 2017 मध्ये सफीद्दीनला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सफीद्दीनचा मुलगा हा इराणी जनरलचा जावई आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या परदेशी ऑपरेशन्स शाखेचा कमांडर जनरल कासिम सुलेमानी याच्या मुलीशी सफीद्दीनच्या मुलाचे लग्न झाले आहे. 2020 मध्ये इराकमध्ये अमेरिकन हल्ल्यात जनरल कासिम मारला गेला. आता हा कट्टरतावादी हिजबुल्लाचा प्रमुख झाला आहे.
हवाई हल्ल्यात नसरल्लाहचा खात्मा
इस्रायली लष्कराचे प्रवक्ता लेफ्टनन्ट कर्नल नादाव शोशानी यांनी एक्सवर पोस्ट करत नसरल्लाहच्या खात्म्याची माहिती दिली आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डेव्हिड अव्राहम यांनी सांगितले की, "लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतमध्ये शुक्रवारी (27 सप्टेंबर 2024) करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुकाचा खात्मा झाला आहे. हसन नसराल्लाहला मारण्यासाठी ऑपरेशन NEW ORDER राबवण्यात आले होते." एवढेच नाही तर, जो कुणी इस्रायलला धमकी देईल, त्याच्यापर्यंत कसे पोहोचायचे हे आम्हाला माहीत आहे, असेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे. टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, त्यांनी काल हिजुबल्लाहच्या हेडक्वार्टरवर हल्ला केला होता. तेथे हसन नसरल्लाह देखील उपस्थित होता. इस्रायली सैनिक बेरूतसह विविध भागांत सातत्याने हल्ला करत आहे.
The Israeli @IDF confirms that Hassan Nasrallah, the leader of the Hezbollah terrorist organization and one of its founders, was eliminated yesterday, together with Ali Karki, the Commander of Hezbollah’s Southern Front, and additional Hezbollah commanders.
— Israel ישראל (@Israel) September 28, 2024
Nasrallah will no… pic.twitter.com/aThduf0bwe
नसरल्लाहची मुलगीही ठार
IDF ने शनिवारी हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाह मारला गेल्याची माहिती दिली होती. तसेच, एक्सवर पोस्ट करत, 'आता हसन नसराल्लाह जगात दहशत पसरवू शकणार नाहीत', असे म्हटले आहे. हसन नसरल्ला 32 वर्षे हिजबुल्लाहचा प्रमुख होता. या हवाई हल्ल्यात 6 इमारतींना निशाणा बनवण्यात आले होते. ज्यांत नसरल्लाह लपलेला होता. या हल्ल्यात नसरल्लाह शिवाय, मिसाइल युनिटचा कमांडर मुहम्मद अली इस्माइल आणि त्याचा सहकारी हुसेन अहमद इस्माईलही मारला गेला. महत्वाचे म्हणजे, नसरल्लाहची मुलगी जैनब नसरल्लाहदेखील या हल्ल्यात ठार झाली आहे.
अमेरिकेच्या बॉम्बने नसरल्लाहचा खात्मा
इस्रायलने गाझा आणि लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांत अमेरिकेच्या भागिदारीने इराण संतापला आहे. इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतवर टाकलेले बॉम्ब अमेरिकेने भेट म्हणून दिले होते. इराणने म्हटले आहे की, या हल्ल्यात इस्रायलने अमेरिकेने दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला आहे. मात्र, आपल्याला या हल्ल्यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नव्हती, असे अमेरिकेने म्हटले आहे. मात्र, अमेरिकेने या घटनेसाठी इस्रायलला पाठिंबा दिला आहे.
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून