भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:12 IST2025-04-24T15:10:59+5:302025-04-24T15:12:38+5:30
Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना केली जारी

भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी काही दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ भारतीय निष्पाप हिंदू नागरिकांची हत्या केली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पावले उचलण्यात आली. सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला. तसेच ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर होण्यास सांगण्यात आले. याशिवाय, भारतातील पाकिस्तानचे उच्च आयुक्तालयही बंद करण्यात आले. भारताने कडक कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांनी दुसऱ्याच दिवशी क्षेपणास्त्र चाचणी करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने २४ किंवा २५ एप्रिल रोजी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना जारी केली आहे.
पाकिस्तानच्या कुरापतींकडे भारताची बारीक नजर
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केल्यामुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केली असल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. अशा वेळी बिथरलेल्या पाकिस्तानने लगेच दुसऱ्याच दिवशी मिसाईल टेस्टची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही कमी होत नसल्याने पाकिस्तानच्या या घोषणेनंतर भारतीय एजन्सी या चाचणीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच भारतीय सुरक्षा यंत्रणादेखील इतर सर्व घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत.
क्षेपणास्त्र चाचणी कधी होणार?
वृत्तसंस्था एएनआयने संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानने २४, २५ एप्रिल रोजी कराची किनाऱ्याजवळ त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून चाचणी घेण्याची माहिती दिली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे असे हे मिसाइल आहे. हे क्षेपणास्त्र चाचणी करण्याची अधिसूचना पाकिस्तानने जारी केली आहे. त्यामुळे संबंधित भारतीय संस्था या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
'बीटिंग द रिट्रीट' सेरेमनी रद्द
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. हल्ला झाल्यानंतर भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी बॅगा पॅक करून पाकिस्तानात जाण्यासाठी LOC वर गर्दी केली आहे. भारतीयांना बदला हवाय असा सूर देशभरातून उमटू लागला आहे. यादरम्यान, बीएसएफ केंद्राच्या एका आदेशाची वाट पाहत आहे. सूर्यास्तापूर्वी आदेश आला तर दररोज होणारा बीटिंग द रिट्रीट सेरेमनी बंद करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.