पाकिस्तान, चीनपाठोपाठ रशियाचाही तालिबानला पाठिंबा, म्हणाले, आता काबुल अधिक सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 09:16 AM2021-08-17T09:16:18+5:302021-08-17T09:19:20+5:30

Taliban in Afghanistan: रविवारी तालिबानी दहशतवाद्यांनी काबुलमध्ये प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी देश सोडून पसार झाले. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर तालिबानने देशाची सत्तासूत्रे हातात घेतली आहेत.

After Pakistan & China and Russia support the Taliban, said, Kabul is now more safer | पाकिस्तान, चीनपाठोपाठ रशियाचाही तालिबानला पाठिंबा, म्हणाले, आता काबुल अधिक सुरक्षित

पाकिस्तान, चीनपाठोपाठ रशियाचाही तालिबानला पाठिंबा, म्हणाले, आता काबुल अधिक सुरक्षित

Next

मॉस्को - जवळपास २० वर्षे अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून असलेले अमेरिकन सैन्य माघारी परतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. (Taliban in Afghanistan) रविवारी तालिबानी दहशतवाद्यांनी काबुलमध्ये प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी देश सोडून पसार झाले. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर तालिबानने देशाची सत्तासूत्रे हातात घेतली आहेत. दरम्यान, पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांनी तालिबानला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, रशियानेही तालिबानला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे समोर येत आहे. (Russia's ambassador to Afghanistan Dmitry Zhirnov said Taliban had made Kabul safer in the first 24 hours than it had been under the previous authorities)

जगभरातील वेगवेगळ्या देशांकडून तालिबानवर टीका होत असताना रशिकाकडून तालिबानला उघडपणे पाठिंबा मिळताना दिसत आहे. रशियाचे अफगाणिस्तानमधील राजदूत दिमित्री जिरनोव्ह यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील याआधीच्या सरकारच्या तुलनेत तालिबाबने पहिल्या २४ तासांमध्ये काबुल अधिक सुरक्षित बनवले आहे. 

दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी रविवारीच देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. राष्ट्रपती निवासानंतर घनी यांचे कार्यालयही तालिबानी नेत्यांनी सोमवारी ताब्यात घेतले आणि तिथे आपला झेंडा लावला. ९० टक्के अफगाण तालिबानींनी ताब्यात घेतला आहे.
तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते  विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. त्या नागरिकांना मृत्यूपेक्षाही तालिबानचीच अधिक भीती वाटत आहे. विमानतळावर तालिबानला कब्जा करता आला नसून ते अमेरिकेच्या ताब्यात आहे. अमेरिकेने आपला दूतावासच  विमानतळावर हलविला आहे. तालिबानी तिथे हल्ले करतील या शक्यतेने तिथे मोठ्या प्रमाणात अमेरिकी सैनिक तैनात आहेत.

सततच्या संघर्षामुळे अफगाणिस्तानात २००१ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सर्वसामान्य नागरिक, सैनिक, बंडखोरांसह एकूण १ लाख ५७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ४३ हजार नागरिक, ४४ हजार अफगाण सैनिक आणि ४२ हजार बंडखोरांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबर २०१९नंतर १३ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचे ही आकडेवारी सांगते.

Web Title: After Pakistan & China and Russia support the Taliban, said, Kabul is now more safer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.