ज्वालामुखीत पडूनही 'तो' वाचला

By admin | Published: February 24, 2017 11:56 AM2017-02-24T11:56:38+5:302017-02-24T11:56:38+5:30

अर्जेंटिनाचा नागरिक असलेले रोडोल्फ अल्वारेज गाईडसोबत जात असताना दोर तुटल्याने मसाया ज्वालामुखीच्या खड्ड्यात जाऊन पडले

After reading the volcano it read 'he' | ज्वालामुखीत पडूनही 'तो' वाचला

ज्वालामुखीत पडूनही 'तो' वाचला

Next
>ऑनलाइन लोकमत
निकरागुआ, दि. 24 - ज्वालामुखी अभ्यासक आपल्या मार्गदर्शकासोबत जिवंत ज्वालामुखीत पडूनदेखील आश्चर्यकारकरित्या वाचला आहे. या दोघांनाही अग्निशन दलाच्या स्थानिक जवानाने वाचवलं आहे. अर्जेंटिनाचा नागरिक असलेले रोडोल्फ अल्वारेज (60) निकरागुआमधील मार्गदर्शक एड्रिक वैलाद्रेज (25) याच्यासोबत जात असताना दोर तुटल्याने मसाया ज्वालामुखीच्या खड्ड्यात जाऊन पडले. 
 
(भारतातला एकमेव जिवंत ज्वालामुखी 150 वर्षांनी पुन्हा सक्रिय)
 
यानंतर एका अग्निशमन दलाच्या स्थानिक जवानाने दोरच्या सहाय्याने खाली उतरुन दोघांचीही सुटका केली. रोडोल्फ अल्वारेज आणि एड्रिक वैलाद्रेज दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. मात्र ज्वालामुखीच्या या खड्ड्यात तापमान प्रचंड असल्याने दोघांनाही डिहायड्रेशनचा त्रास झाला आहे. 
 
मानगुआपासून 12 मैलावर दक्षिणेकडे मसाया ज्वालामुखी आहे. 1772 मध्ये पहिल्यांदा हा ज्वालामुखी जागा झाला होता. 2001 मध्ये या ज्वालामुखीमधून भीषण स्फोट झाले होते. तब्बल 500 मीटर दूरपर्यत लाव्हा आणि दगडं आली होती. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाली होता.
 

Web Title: After reading the volcano it read 'he'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.