सात वर्षांच्या कोमानंतर तिने तिची मुलगी पहिल्यांदा पाहिली
By Admin | Published: March 13, 2017 12:39 AM2017-03-13T00:39:13+5:302017-03-13T00:39:13+5:30
बाळंतपणाच्या अतितीव्र वेदनांमुळे २००९ मध्ये कोमात गेलेली २५ वर्षांची आई सात वर्षांनंतर कोमातून बाहेर आल्यावर आपल्या तेव्हा जन्म दिलेल्या मुलीला पहिल्यांदाच बघू शकली
बाळंतपणाच्या अतितीव्र वेदनांमुळे २००९ मध्ये कोमात गेलेली २५ वर्षांची आई सात वर्षांनंतर कोमातून बाहेर आल्यावर आपल्या तेव्हा जन्म दिलेल्या मुलीला पहिल्यांदाच बघू शकली. डॉक्टरांसाठी ही घटना चमत्काराइतकीच आहे.
डॅनिजेला कोव्हॅसेव्हीक असे या आईचे नाव असून ती सर्बियातील व्होजव्होदिना येथील आहे. डॅनिजेला हिला तिची मुलगी मरिजा हिला जन्म देताना पू झाला व डॅनिजेला कोमात गेली. कोमात एवढा प्रदीर्घ काळ राहून कोणी पुन्हा त्यातून बरे झाल्याचे सर्बियाच्या वैद्यकीय क्षेत्रातील कोणाच्या बघण्यात नाही.
डॅनिजेलाच्या कौटुंबिक मित्राने सांगितले की,‘‘शाळा संपली की मरिजा रोज तिच्या आईच्या जवळ असायची. मुलगी आईचे सांत्वन करायची, ती हसेल असे काही करायची. आई मला एक दिवस
स्पर्श करील आणि कवटाळेल ही आशा कधी तिने सोडली नाही.’’
आता माझी मुलगी पेन हातात धरते आणि औषधांच्या गोळ््याही घेते हे डॅनिजेलाचे वडील डीजोरदीजे कोव्हॅसीव्हीक यांनी सांगितले. अर्थात ही अगदीच प्राथमिक स्वरुपाची प्रगती आहे परंतु डॅनिजेलाची परिस्थिती आता पूर्वीपेक्षा खूप चांगली आहे. आता तिचे वजनही वाढले आहे, ती आता अधिक सावध दिसते आणि उत्साही. ती हसून प्रतिसाद देते व तिला रागही येतो, असे ते म्हणाले. तुम्ही एका लहान मुलाला काही गोष्टी करायला शिकवत आहात. ती आठशे मीटर अंतर चालली व ते फार मोठे यश आहे, असे ते म्हणाले.