श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशही सकंटात! डॉलरअभावी तेलाचा तुटवडा; भारताकडून मदतीची आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 10:57 AM2023-05-23T10:57:11+5:302023-05-23T10:59:12+5:30

बांगलादेशातही डॉलरचे संकट निर्माण झाले असून ते कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्चही भरू शकत नाही. डॉलरच्या तुटवड्यामुळे पेमेंट करणे कठीण झाले असून नवीन आयात करणे शक्य होणार नाही.

after srilanka and pakistan now crisis in banglesh appeals to india | श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशही सकंटात! डॉलरअभावी तेलाचा तुटवडा; भारताकडून मदतीची आशा

श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशही सकंटात! डॉलरअभावी तेलाचा तुटवडा; भारताकडून मदतीची आशा

googlenewsNext

भारताच्या शेजारील देश आर्थिक संकटात सापडले आहेत. अगोदर श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. यानंतर काहीच महिन्यात पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला. आता बांगलादेशही संकटात सापडलाय. बांगलादेशमध्ये डॉलरचे संकट निर्माण झाले आहे. कच्च्या तेलाचे पैसे देण्यासाठी बांगलादेशकडे डॉलरचा तुटवडा आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडे ३०० डॉलर मिलियनची रक्कम आहे, जी त्यांना तेल खरेदीच्या बदल्यात भरावी लागेल. पण डॉलरच्या तुटवड्यामुळे पेमेंट करणे कठीण होऊन नवीन आयात करणे शक्य होणार नाही.

RRR: राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील दिग्गज अभिनेत्याचं निधन

बांगलादेशमध्ये देशभरात बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनद्वारे तेलाचा पुरवठा केला जातो. दरम्यान, कंपनीने सरकारला विनंती केली आहे की देशाच्या वित्तीय बँकांना भारताची थकबाकी फक्त रुपयांमध्ये भरण्याची परवानगी द्यावी. बांगलादेशचा परकीय चलनाचा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत एक तृतीयांश राहिला आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून ते कमी होत आहे. १७ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, बांगलादेशकडे एकूण डॉलरचा साठा फक्त ३०.२ अब्ज डॉलर इतकाच राहिला आहे.

कच्च्या तेलाच्या आयातीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या बांगलादेशसाठी संकट अधिक गडद आहे. तेलाच्या तुटवड्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून त्यामुळे उद्योगधंद्यांनाही फटका बसला आहे. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा कणा कापड आणि चपला उत्पादन हा पूर्णपणे निर्यात उद्योग मानला जातो. यामध्ये कामावर परिणाम झाला, तर अर्थव्यवस्था सांभाळणे कठीण होईल आणि बेरोजगारी झाल्यास राजकीय स्थैर्यही धोक्यात येईल. बांगलादेशच्या सरकारी तेल कंपनीचे म्हणणे आहे की डॉलरच्या तुटवड्यामुळे पेमेंट केले जात नाही. मध्यवर्ती बँकही ही समस्या सोडवू शकत नसल्याने इंधन टंचाईचे संकट उभे राहू शकते.

कंपनीने म्हटले आहे की, मे महिन्यात तेल खरेदी नियोजित वेळेपेक्षा कमी होती आणि साठा झपाट्याने कमी होत आहे. हीच परिस्थिती राहिली तर चिंतेची बात होऊ शकते. बांगलादेश दर महिन्याला ५ लाख टन शुद्ध तेल आणि १ लाख टन कच्चे तेल खरेदी करतो. ते चीनच्या सिनोपेक, भारताचे इंडियन ऑइल आणि इंडोनेशियाच्या बीएसपीकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. पेमेंट न आल्यास पुरवठा सुरू ठेवणे कठीण होईल, असे अनेक ठिकाणांहून सांगण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय काही कंपन्यांनी पूर्वीच्या तुलनेत मालाचा पुरवठा कमी केला आहे. सध्या बांगलादेशला भारताकडून अपेक्षा आहे की ते डॉलरऐवजी रुपयात पेमेंट करू शकतील.

Web Title: after srilanka and pakistan now crisis in banglesh appeals to india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.