दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकेत मुस्लीमांविरोधातील हल्ल्यात ३०० टक्के वाढ

By admin | Published: December 18, 2015 01:25 PM2015-12-18T13:25:35+5:302015-12-18T13:25:35+5:30

पॅरीस व कॅलिफोर्निया येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकी मुस्लीम व मशिदी यांच्याविरोधातल्या हेट क्राइम्समध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे वृत्त न्यू यॉर्क टाइम्सने दिले

After terrorist attacks, 300 per cent increase in attacks against Muslims in America | दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकेत मुस्लीमांविरोधातील हल्ल्यात ३०० टक्के वाढ

दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकेत मुस्लीमांविरोधातील हल्ल्यात ३०० टक्के वाढ

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १८ - पॅरीस व कॅलिफोर्निया येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकी मुस्लीम व मशिदी यांच्याविरोधातल्या हेट क्राइम्समध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे वृत्त न्यू यॉर्क टाइम्सने दिले आहे. हिजाब घालणा-या विद्यार्थिनींवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच मशिदींवरही हल्ले करण्यात आले आहेत. मुस्लीम व्यक्ती मालक असलेल्या उद्योगांनाही धमक्या देण्यात आल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
राजकीय नेत्यांनी इस्लामविरोधी वक्तव्ये केल्याचेही प्रकार घडले असून त्यानंतर सदर  अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ले आणि मुस्लीमविरोधी द्वेषपूर्ण भाषणांमुळे भयग्रस्त अमेरिकी तरूण आपला राग मुस्लीमांवर हल्ले करून व्यक्त करत असल्याचे क्रिमिनोलॉजिस्ट ब्रायन लेविन यांनी म्हटले आहे. 
अर्थात, ११ सप्टेंबर २०११ मध्ये अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यानंतर जितक्या प्रमाणात हेट क्राइम वाढले होते, तेवढे प्रमाण सध्याच्या हेट क्राइममध्ये नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ११ सप्टेंबरनंतर शेकडो मुस्लीमांवर व मुस्लीम समजून काही शिखांवर हल्ले करण्यात आले होते. असे हल्ले होणे ही दु:खाची बाब आहे, परंतु यात आश्चर्यजनक असे काही नाही असे लेविन यांचे म्हणणे आहे. ज्यावेळी दोन समजांमध्ये संघर्षाची स्थिती होते आणि वृत्तपत्रांचे मथळे अशा वृत्तांनी भरतात, त्यावेळ हेट क्राइममध्ये वाढ होते असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे. 
पॅरीसवरील हल्ल्यानंतर सहाव्या इयत्तेतल्या एका मुलीचा हिजाब जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न तीन मुलांनी केला, तसेच तिला मारहाण केली व हे करत असताना तिचा उल्लेख इस्लामिक स्टेट असा केला. एका प्रवाशाने कारचा ड्रायव्हर मुस्लीम  असल्याचे दिसताच प्रेषित मोहम्मदांची अवहेलना करत त्या  ड्रायव्हरला गोळ्या घातल्या. तर कॅलिफोर्नियात एका मुस्लीमाच्या दुकानाबाहेर बंदुकीच्या गोळ्यांनी चाळणी केलेली कुराणाची प्रत टाकलेली आढळली. 
काउन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशनचे प्रवक्ते इब्राहिम हूपर यांनी मुस्लीमांविरोधातल्या हेट क्राइम्समध्ये अविश्वसनीय वाढ झाल्याचे नमूद केले आहे. तसेच, हे प्रकार इतक्यात थांबतिल असं वाटत नसल्याचंही त्यांनी खेदाने म्हटले आहे.

Web Title: After terrorist attacks, 300 per cent increase in attacks against Muslims in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.