ट्रम्प यांनी 145 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, जिनपिंग यांचं EU ला मोठं आवाहन; म्हणाले, "अमेरिकेच्या दादागिरीविरोधात..."!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:04 IST2025-04-11T16:04:17+5:302025-04-11T16:04:59+5:30
अमेरिका कसलाही विचार न करता याच पद्धतीने पावले उचलत राहिला, तर आपणही व्यापार युद्धासाठी तयार आहोत. असेही चीनने म्हटले आहे.

ट्रम्प यांनी 145 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, जिनपिंग यांचं EU ला मोठं आवाहन; म्हणाले, "अमेरिकेच्या दादागिरीविरोधात..."!
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफनंतर, चीनचे धाबे दणाणले आहेत. आता चीनने, अमेरिकेच्या दादागिरीविरोधात एकत्र येऊन काम करायला हवे, असे आवाहन युरोपीय संघाकाला केले आहे. अमेरिकेने चीनकडून येणाऱ्या काही वस्तूंवर तब्बल १४५ टक्क्यांपर्यंतचा तगडा टॅरिफ लावल्यानतंर चीनने युरोपीय संघाला हे आवाहन केले आहे.
याशिवाय, अमेरिका कसलाही विचार न करता याच पद्धतीने पावले उचलत राहिला, तर आपणही व्यापार युद्धासाठी तयार आहोत. असेही चीनने म्हटले आहे.
सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, व्यापारासंदर्भात अमेरिकेचा सामना करण्यासाठी युरोपीय संघाने चीनसोबत काम करायला हवे, असे शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.
जिनपिंग म्हणाले, "चीन आणि युरोपला एकत्रितपणे, आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात आणि अमेरिकेच्या एकतरफी धोरणांचा विरोध करायला हवा. यामुळे केवळ दोघांचे अधिकारच नव्हे, तर हिताचेही संरक्षण होईल. याशिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर न्याय आणि बरोबरीलाही बळकटी मिळेल."
काय म्हणाले स्पेनचे पंतप्रधान -
स्पेनचे पंतप्रधान म्हणाले, व्यापारासंदर्बात सुरू असलेल्या तणावामुळे युरोपीय संघ आणि चीन यांच्यातील सहकार्य संपुष्टात यायला नको. याच बरोबर, "स्पेन आणि युरोपला चीन सोबतच्या व्यापारात घाटा होत आहे, असेही पेड्रो सांचेज यांनी मान्य केले. एवढेच नाही, तर आपले नाते आणि भविष्यातील सहकार्य यांवर या व्यापार तणावाचा कसलाही परिणाम व्हायला नको, असेही त्यांनी म्हटले आहे. स्पेन चीनकडून दरवर्षी 50 बिलियन डॉलरचे सामान खरेदी करतो.
अमेरिके चीन टॅरिफ वॉर -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 एप्रिलला चीन विरोधात 34 टक्के टॅरिफची घोषणा केली. यानंतर चीननेही प्रत्त्युत्तरात अमेरिकेवर 34 टक्के टेरिफ लावला. यानंतर मंगळवारी ट्रम्प यांनी पुन्हा चीनवर 104 टक्क्यांचा अतिरिक्त टॅरिफ लावला. यानंतर चीनने पुन्हा पलटवार करत बुधवारी अमेरिकन वस्तूंवर आपला अतिरिक्त टॅरिफ 34 टक्क्यांवरून वाढवून 84 टक्के केला. हा टॅरिफ गुरुवारी, 10 एप्रिलपासून लागू झाला. यानंतर अमेरिकेने पुन्हा टॅरिफ वाढवून तो 125 टक्के केला. याशिवाय, अमेरिकेने 75 देशांवर लादलेल्या टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे.