सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:43 PM2024-09-19T23:43:03+5:302024-09-19T23:45:17+5:30

Lebanon Explosions, Pager Walkie Talkie Ban on Flight: अशी डिव्हाइस घेऊन विमानात आल्यास उपकरणे जप्त केली जाणार

After two consecutive explosions in Lebanon now pagers walkie-talkies are banned in aircraft | सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी

सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी

Lebanon Explosions, Pager Walkie Talkie Ban on Flight: पेजर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोट झाल्याने लेबनानमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यादरम्यान, लेबनानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या सर्व विमानांवर पेजर आणि वॉकी-टॉकीवर बंदी घातली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत जेट विमानांमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकी घेऊन जाण्यास मनाई आहे. सर्व विमान कंपन्यांनी खबरदारी घ्यायची असून, प्रवाशांकडे तत्सम डिव्हाइस दिसली तर जप्त केली जातील असेही सांगण्यात आले आहे.

मंगळवार आणि बुधवारी लेबनानच्या अनेक भागात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे स्फोट झाले. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले. या स्फोटांनंतर हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह यांनी इस्रायलकडून हल्ल्याचा बदला घेण्याची घोषणा केली आहे. नसराल्लाह म्हणाले की, इस्रायलने हजारो पेजर्सना लक्ष्य केले आहे. त्यांचा स्फोट केला. नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आहे. यासाठी इस्रायलवर प्रत्युत्तराची कारवाई केली जाईल.

शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे नसराल्लाह म्हणाले. दरम्यान, हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले आहेत. इस्रायल आणि हिजबुल्ला सतत एकमेकांना लक्ष्य करत आहेत. दोघांमध्ये मोठे युद्ध होण्याचा धोका वाढला आहे. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी युद्धाच्या नव्या टप्प्याला सुरुवात झाल्याची घोषणा केली आहे. Yoav Gallant म्हणाले की, आम्ही युद्धाच्या नव्या टप्प्याला सुरुवात करत आहोत. इस्त्रायली लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांचे कौतुक करताना ते म्हणाले की, परिणाम अतिशय प्रभावी आहेत. या आठवड्यात सीमेवर अनेक सराव केल्याचे लष्कराने म्हटले आहे.

Web Title: After two consecutive explosions in Lebanon now pagers walkie-talkies are banned in aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.