दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर पीटर नॅन्सीशी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2017 03:25 AM2017-05-22T03:25:59+5:302017-05-22T03:25:59+5:30
सलग दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर पीटर बॅरॅट्ट (८२) यांनी नॅन्सी इव्हॅन्स (८३) यांच्याशी लग्नाची गाठ बांधलीच. तो दिवस होता ईस्टर मंडे.
सलग दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर पीटर बॅरॅट्ट (८२) यांनी नॅन्सी इव्हॅन्स (८३) यांच्याशी लग्नाची गाठ बांधलीच. तो दिवस होता ईस्टर मंडे. पीटर हे सेवानिवृत्त अभियंता असून, ते म्हणाले की, मी तिला (नॅन्सी) चर्च क्लबमध्ये बघितल्यापासून तिच्या प्रेमात पडलो. नॅन्सी या माजी सचिव आहेत. त्यांची भेट झाल्यापासून तीन महिन्यांनी पीटर यांनी नॅन्सी यांच्यापुढे डिनर घेताना लग्नाचा प्रस्ताव मांडला. (पीटर यांनी एका गुडघ्यावर बसून लग्नाचा प्रस्ताव दिला नाही. कारण त्यांना गुडघा टेकवला की, परत उठता येत नाही.) नॅन्सी यांना नऊ नातवंडे आहेत. त्यांनी सुरुवातीला पीटर यांच्या प्रस्तावाला नकार दिला होता. कारण तसे झाले तर आपल्याला स्वातंत्र्य गमवावे लागेल, अशी भीती त्यांना होती. पीटर यांनी मात्र नॅन्सी यांना दर आठवड्याला जेवायला घेऊन जाणे व फुले देऊन पाठपुरावा सुरूच ठेवला होता. शेवटी जानेवारीमध्ये नॅन्सी यांनी मनाची तयारी केली. स्थानिक चर्चमध्ये त्यांचा विवाह झाला. त्याला मित्र व नातेवाईक मिळून ८० जण उपस्थित होते. स्वागत समारंभ नॅन्सी यांच्या केअर होमध्ये झाला. त्याला खर्च आला ६०० पौंड. नॉर्थ सॉमरसेटमधील वेस्टन- सुपर- मेअर येथे त्या दोघांचा मधुचंद्रही झाला.