अमेरिकेने नाक दाबल्यामुळे रशियाचे एक पाऊल मागे; यूक्रेन सीमेवरुन काही सैन्य माघारी पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 06:27 AM2022-02-16T06:27:34+5:302022-02-16T06:29:26+5:30

क्रेनमधील भारतीयांनी विशेषत: विद्यार्थ्यांनी तात्पुरते तेथून बाहेर पडण्याची सूचना भारतीय दूतावासाने केली

After US Interfer Russia takes a step back; some troops back from the Ukraine border | अमेरिकेने नाक दाबल्यामुळे रशियाचे एक पाऊल मागे; यूक्रेन सीमेवरुन काही सैन्य माघारी पाठवले

अमेरिकेने नाक दाबल्यामुळे रशियाचे एक पाऊल मागे; यूक्रेन सीमेवरुन काही सैन्य माघारी पाठवले

Next

 नवी दिल्ली : नाॅर्ड स्ट्रीम पाईपलाईनवरून अमेरिकेने नाक दाबल्यामुळे रशियाने एक पाऊल मागे घेत युक्रेनच्या सीमेवरून काही सैन्य तुकड्यांना माघारी पाठविणे सुरु केले आहे. त्यामुळे परिस्थिती काही प्रमाणात निवळल्याचे दिसत असले तरीही युद्धाचे ढग अजूनही कायम आहेत. 

क्रेनमधील भारतीयांनी विशेषत: विद्यार्थ्यांनी तात्पुरते तेथून बाहेर पडण्याची सूचना भारतीय दूतावासाने केली. युक्रेनमध्ये सुमारे २० हजार भारतीय विद्यार्थी आहेत. तसेच युक्रेनमधील भारतीयांनी आपल्या वास्तव्याबाबत माहिती दूतावासाकडे द्यावी. तसेच त्यांनी युक्रेनमध्ये देशांतर्गत प्रवासही टाळावा, असेही दूतावासाने म्हटले. 

सीमेवरील कवायती संपल्या
रशियाने युक्रेनच्या सीमेवर १ लाखांहून अधिक सैनिक तैनात हाेते. बेलारूसची सीमा तसेच काळ्या समुद्रातील रशियन लष्कर आणि नाैदलाच्या कवायती संपल्यामुळे काही तुकड्या आपापल्या तळांवर परतण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिकेचा इशारा 
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशिया आणि जर्मनीमधील नॉर्ड स्ट्रीम २ पाईपलाईन बंद पाडण्याची धमकी दिली. याच मुद्यावरून जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्काेल्झ यांनीही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन चर्चेद्वारे मार्ग काढण्यासाठी दबाव टाकल्याचे बोलले जात आहे. ही पाईपालईन रशिया आणि जर्मनीसाठी खूप महत्त्वाची आहे.

Web Title: After US Interfer Russia takes a step back; some troops back from the Ukraine border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.