मुलाला कॅमेरॅसमोर का मारली थापड? 'महिला चांद नवाब'नं दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 05:45 PM2022-07-14T17:45:01+5:302022-07-14T17:45:26+5:30
पाकिस्तानची महिला रिपोर्टर मायरा हाश्मी हिने व्हायरल होत असलेल्या तिच्या एका व्हिडिओसंदर्भात आता स्पष्टीकरण दिले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ...
पाकिस्तानची महिला रिपोर्टर मायरा हाश्मी हिने व्हायरल होत असलेल्या तिच्या एका व्हिडिओसंदर्भात आता स्पष्टीकरण दिले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती कॅमेऱ्यासमोरच एका मुलाला थापड मारताना दिसते. माध्यमांतील वृत्तांमध्ये हा मुलगा संबंधित पत्रकार महिलेला त्रास देत होता, असा दावा करण्यात आला होता. आता 24 वर्षीय मायरा हाशमीने 9 जुलैच्या या घटनेसंदर्भात स्पष्टिकरण दिले आहे.
उर्दू भाषेत केलेल्या एका ट्विटमध्ये तीने म्हटले आहे, की तेथे एक कुटुंब होते, त्या कुटुंबाची मुलाखत सुरू होती. यावेळी तो मुलगा त्यांना त्रास देत होता. त्याला अनेक वेळा शांततेत समजावून सांगीतले. मात्र, तो शिवीगाळ करतच होता. यामुळे त्याला धडा शिकविण्यासाठी थापड मारावी लागली.
یہ لڑکا انٹرویو کے دوران فیملی کو تنگ کر رہا تھا _جسکی وجہ سے فیملی پریشان ہوگئی تھی__میں نے پہلے پیار سے سمجھایا کے ایسا نہیں کرو مگر سمجھانے کے باوجود یہ لڑکا نہیں سمجھا اور زیادہ ہُلّڑ بازی کررہا تھا_ جس کے بعد مجھے زیب نہیں دیا کہ اسے اور موقع دیکر برداشت کیا جائے ؟ pic.twitter.com/4jmuSsInYg
— Maira Hashmi (@MairaHashmi7) July 11, 2022
नेमकं काय आहे प्रकरण -
या महिला पत्रकाराने लाइव्ह रिपोर्टिंग दराम्यान कॅमेऱ्यासमोर आल्याने एक मुलगाच्या कानाखाली लगावली होती. यानंतर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला. माध्यमांतील वृत्तानुसार, पाकिस्तानात ईद उल अजहानिमित्त एक महिला रिपोर्टर रिपोर्टिंग करत असताना हा प्रकार घडला.
हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली होती. काही युजर्सना तर, हा प्रकार नेमका का घडला, हे समजू शकले नाही. तर काहींनी संबंधित महिलेच्या अशा कृत्यावर आक्षेप घेतला होता. मात्र, बहुतांश लोक रिपोर्टच्या बाजूनेच दिसून आले होते.