हिंसाचारानंतर फ्रान्समध्ये इंधन दरवाढ अखेर मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 04:39 AM2018-12-05T04:39:17+5:302018-12-05T04:39:24+5:30

लोकांनी रस्त्यांवर येऊन तीन आठवडे वाढता हिंसक संताप व्यक्त केल्यामुळे अखेर फ्रान्स सरकारने पर्यावरण-इंधन कर लागू करण्याचा निर्णय निलंबित केला आहे.

After the violence, the fuel price hike in France is behind | हिंसाचारानंतर फ्रान्समध्ये इंधन दरवाढ अखेर मागे

हिंसाचारानंतर फ्रान्समध्ये इंधन दरवाढ अखेर मागे

Next

पॅरिस : लोकांनी रस्त्यांवर येऊन तीन आठवडे वाढता हिंसक संताप व्यक्त केल्यामुळे अखेर फ्रान्स सरकारने पर्यावरण-इंधन कर लागू करण्याचा निर्णय निलंबित केला आहे.
लोकांच्या दडपणाला नमून पंतप्रधान एदुआर्द फिलिप्पे यांनी गॅस आणि वीजदरवाढही ताबडतोब गोठवण्याचा निर्णय जाहीर करताना आणखी हिंसाचार सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. पॅरिसमध्ये दंगली, लुटालूट आणि नासधूस झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मंगळवारी सकाळी आपल्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांची भेट घेऊन पर्यावरण-इंधन कर लागू न करण्याची घोषणा केली. स्वच्छ इंधनाच्या वापराच्या दिशेने पाऊल म्हणून पुढील महिन्यात पेट्रोल व डिझेलवर कर लावला जाणार होता. (वृत्तसंस्था)

Web Title: After the violence, the fuel price hike in France is behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.