दुस-या महायुद्धानंतर दुरावलेले प्रेमी ७० वर्षांनी करणार लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2016 09:43 AM2016-04-06T09:43:15+5:302016-04-06T09:46:45+5:30

दुस-या महायुद्धादरम्यान दुरावलेले रॉय व नोरा तब्बल ७० वर्षांनी एकत्र आले असून लवकरच लग्न करणार आहेत.

After World War II, lovers will be married after 70 years | दुस-या महायुद्धानंतर दुरावलेले प्रेमी ७० वर्षांनी करणार लग्न

दुस-या महायुद्धानंतर दुरावलेले प्रेमी ७० वर्षांनी करणार लग्न

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ६ - दुस-या महायुद्धात सहभागी झालेल्या 'त्या'च्यावर युद्धातील हिंसाचाराचा, जीविताहानीचा इतका परिणाम झाला की त्याने आपल्या वाग्दत्त वधूशी लग्न मोडले.. मात्र आपले खरे प्रमे विसरू न शकल्याने तब्बल ७० वर्षांनी 'त्या'ने परत तिचा शोध घेतला आणि आता अखेर ते दोघे लग्न करणार आहेत.
खरतरं एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही घटना... पण लंडनमध्ये ही घटना प्रत्यक्षात घडली असून दुस-या महायुद्धादरम्यान दुरावलेले प्रेमी रॉय विकरमॅन आणि नोरा जॅकसन हे तब्बल ७० वर्षांनी वयाच्या नव्वदीत एकमेकांशी 'विवाहबद्ध' होत आहेत.
 
स्टॅफोर्डशायरमधील हार्टशील येथे राहणारे रॉय आणि नोरा या दोघांचीही दुस-या महायुद्धाआधी एंगेजमेंट झाली होती, मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसातंच रॉय यांना युद्धात सहभागी होण्यासाठी जावे लागले. रॉय यांनी जून १९४४च्या तसेच १९४४ डिसेंबर तेजानेवारी १९४५ दरम्यान झालेल्या 'बॅटल ऑफ बल्ज' या युद्धांमध्ये सहभाग घेतला. मात्र त्यादरम्यान झालेला हिंसाचार, जीवितहानी यांचा रॉय यांच्या मनावर प्रचंड परिणाम ( पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) झाला होता, त्या दु:खद आठवणींमुळे ते अस्वस्थ झाले आणि त्यामुळेच त्यांनी नोराशी झालेली एंगेजमेंट तोडून टाकली. 
या घटनेला अनेक दशकं उलटून गेल्यानंतरही रॉय यांना आपल्या प्रेमाचा विसर पडला नव्हता, त्यामुळेच त्यांनी एका स्थानिक रेडिओ चॅनलच्या मदतीने नोराचा शोध घेतला आणि नोराची माफी मागण्यासाठी ते फुलांचा गुच्छ घेऊन तिच्या घरी गेले. दार उघडताच नोरा यांनी रॉयला पाहिले आणि स्वत:ला त्यांच्या मिठीत झोकून दिलं. आणि अखेर एका वर्षांच्या रिलेशननंतर रॉय यांनी ९०व्या वाढदिवशी ८९ वर्षांच्या नोराला तीच अंगठी देऊन प्रपोज केले आणि त्या दोघांची पुन्हा एंगेजमेंट झाली. आता थोड्याच दिवसात ते विवाहबद्ध होतील. 
नोरा यांचे याआधी लग्न झाले होते, मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. रॉय यांना पुन्हा कधी पाहू शकू अशी मला आशाच नव्हती, पण त्यादिवशी त्यांना माझ्या घरासमोर पाहून मला अतिशय आनंद झाला, असे नोरा यांनी सांगितले. रॉयसोबत पुढचं आयुष्य काढण्यासाठी मी अतिशय उत्सुक असल्याचेही त्या म्हणाल्या.

Web Title: After World War II, lovers will be married after 70 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.