मॉरीशसचे अगलेगा बेट आणि भारताचे कनेक्शन? धावपट्टीजवळ मिलिट्री हँगर, जग कोड्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 05:44 PM2023-06-19T17:44:19+5:302023-06-19T17:44:47+5:30

अगलेगा बेट हे मॉरीशसच्या मुख्य बेटांपासून ११०० किमी दूरवर आहे. या बेटाची लांबी १२. किमी आणि रुंदी १.५ किमी आहे.

Agalega Island of Mauritius and India connection? A military hangar near the runway, world in puzzle | मॉरीशसचे अगलेगा बेट आणि भारताचे कनेक्शन? धावपट्टीजवळ मिलिट्री हँगर, जग कोड्यात

मॉरीशसचे अगलेगा बेट आणि भारताचे कनेक्शन? धावपट्टीजवळ मिलिट्री हँगर, जग कोड्यात

googlenewsNext

हिंदी महासागरातील मॉरीशसच्या एका बेटाची जगभरात चर्चा सुरु होती. या बेटाचे संबंध भारताशी जोडले जात होते. या बेटावर भारताने आपला सैनिकी अड्डा बनविल्याचे अनेक सैन्य विशेषज्ञ सांगत आहेत. परंतू, यावर भारताने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने एक रहस्यच बनून गेले आहे. आता सॅटेलाईट ईमेज या अगलेगा बेटावरील त्या एअर स्ट्रीपजवळ हँगर दिसत आहे. तो सामान्य नसून मिलिट्रीचा आहे. 

@detresfa_ या ओपन सोर्स इंटेलिजन्स एजन्सीने ही सॅटेलाईट इमेज जारी केली आहे. यामध्ये एअर स्ट्रीपच्या जवळ नवीन बांधकाम दाखविण्यात आले आहे. तो जो हँगर बनविला जात आहे, रनवे, टॅक्सीवे आणि एप्रनची चिन्हे देखील स्पष्ट दिसत आहेत. गेल्या वर्षी या बेटावरील हवाई धावपट्टीची निर्मिती भारताने केली असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या लोवी इंस्टीट्यूटने केला होता. यानंतर काही दिवसांनी अल जझीराने देखील असाच दावा केला होता. 

अगलेगा बेट हे मॉरीशसच्या मुख्य बेटांपासून ११०० किमी दूरवर आहे. या बेटाची लांबी १२. किमी आणि रुंदी १.५ किमी आहे. हे बेट ६४०० एकरमध्ये पसरलेले आहे. या बेटावर जवळपास ३०० लोक राहत असून त्यांची उपजिवीका ही मासेमारी आणि नारळाच्या शेतीवर चालते. 

का आहे महत्वाचे...
अगलेगा बेट हे भारतीय नौदलासाठी खूप महत्वाचे ठरणार आहे. जगभरातील एकूण व्यापारापैकी ३५ टक्के जहाजे याच बेटाजवळून जातात. या बेटामुळे भारत आपल्या दक्षिणेकडील समुद्र किनाऱ्यांची चांगली सुरक्षा करू शकतो. चीन हिंदी महासागरात आपला विस्तार करत आहे. असे असताना जर हे भारताचे बेट झाले तर चीनला जरब बसणार आहे. 

Web Title: Agalega Island of Mauritius and India connection? A military hangar near the runway, world in puzzle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.