Aghanistan Taliban: अफगाणिस्तानवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन करणार मोठी घोषणा?; थोड्याच वेळात देशाला संबोधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 09:56 PM2021-08-31T21:56:00+5:302021-08-31T21:57:15+5:30

सध्या संपूर्ण जगाचं लक्ष राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्यावर लागलं आहे. बायडन त्यांच्या भाषणात मोठी घोषणा करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Aghanistan Taliban: US President Joe Biden will address the country shortly | Aghanistan Taliban: अफगाणिस्तानवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन करणार मोठी घोषणा?; थोड्याच वेळात देशाला संबोधणार

Aghanistan Taliban: अफगाणिस्तानवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन करणार मोठी घोषणा?; थोड्याच वेळात देशाला संबोधणार

Next
ठळक मुद्देअफगाणिस्तान आणि तालिबान यांच्या भविष्याच्या दृष्टीने अमेरिका पुढे काय करणार?आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अफगाणिस्तान सोडल्यानंतर त्यांच्या भविष्य प्लॅनबद्दलचं ब्लूप्रिंट जगाला दाखवतीलतालिबानने अमेरिकन सैन्याचं परतणं त्यांच्या विजयाचं आणि अमेरिकेच्या पराभवाचं चित्र उभं केले आहे.

अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबाननं(Taliban) कब्जा केल्यानंतर आता अमेरिका पुढं काय करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. ३१ ऑगस्टपूर्वी तालिबाननं अमेरिकेला सैन्य मागे घेण्याची मुदत दिली होती. मात्र अमेरिकेने २४ तास आधीच अफगाणिस्तानातून सैन्य पुन्हा मायदेशी बोलावलं. आता भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन(Joe Biden) जनतेला संबोधित करणार आहेत.

सध्या संपूर्ण जगाचं लक्ष राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्यावर लागलं आहे. बायडन त्यांच्या भाषणात मोठी घोषणा करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्या भविष्याच्या दृष्टीने अमेरिका पुढे काय करणार यावर ही घोषणा असू शकते. नेमकं ज्यो बायडन काय बोलतील हे काही वेळातच सगळ्यांनाच कळणार आहे. परंतु बायडन यांच्या भाषणात ५ महत्त्वाचे मुद्दे असू शकतात.

काय आहेत ५ मुद्दे?

  1. २४ तासआधी अफगाणिस्तान सोडण्याचं कारण
  2. तालिबानला आर्थिक मदत मिळणार का?
  3. अफगाणिस्तानात पुन्हा अमेरिकेचे सैन्य पाठवणार की नाही?
  4. अमेरिकेचे दुतावास कार्यालय स्थलांतर करण्याचा उद्देश
  5. अफगाणिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन बनल्यास काय असेल भूमिका?

 

आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अफगाणिस्तान सोडल्यानंतर त्यांच्या भविष्य प्लॅनबद्दलचं ब्लूप्रिंट जगाला दाखवतील. त्याआधीच तालिबानकडून मोठा हल्ला झाला आहे. तालिबानने अमेरिकन सैन्याचं परतणं त्यांच्या विजयाचं आणि अमेरिकेच्या पराभवाचं चित्र उभं केले आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, काबुल एअरपोर्टवरुन अमेरिकेचे सैन्य परतले आहेत. आता आमचा देश पूर्णत: स्वातंत्र्य झाला आहे. अमेरिकेचे सगळे सैन्य अफगाणिस्तानातून गेले आहे. २० वर्षाचं मिलिट्री मिशन संपलं आहे. ज्यात हजारो सैनिक मारले गेले. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. अमेरिकेचा पराभव दुसऱ्या आक्रमणकर्त्यांसाठी एक धडा आहे. आज तालिबान काबुल एअरपोर्टचा मालक आहे. ज्या एअरपोर्टवर काही वेळेपूर्वी अमेरिकेची सत्ता होती. काबुल एअरपोर्ट तालिबानने हातात घेतलं आहे.

अमेरिकेचे शस्त्र वाया गेली

एका रिपोर्टनुसार, तालिबानला वाटत होतं की, ते अमेरिकेन विमान आणि शस्त्रांचा वापर करू शकतात परंतु त्यांच्या स्वप्नाला ग्रहण लागलं आहे. अफगाणिस्तान सोडताना अमेरिकन सैन्यानं त्यांच्या विमानं आणि सैन्य गाड्या खराब केल्या आहेत जेणेकरून त्याचा वापर तालिबानला करता येऊ शकणार नाही. अमेरिकन सैन्याने एअरपोर्टवर ७३ एअरक्राफ्ट, ७० शस्त्रयुक्त गाड्या. २७ वाहनं निष्क्रिय केली आहेत. ज्याचा वापर करणं आता शक्य नाही. अमेरिकेने त्यांच्या अत्याधुनिक रॉकेट डिफेंन्सनं हे निष्क्रिय केले आहे.

Web Title: Aghanistan Taliban: US President Joe Biden will address the country shortly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.