अगुस्ता वेस्टलँड घोटाळ्यातील आरोपीचे दुबईतून प्रत्यार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 06:33 AM2018-12-05T06:33:10+5:302018-12-05T06:33:23+5:30
अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात हवा असलेला ब्रिटीश नागरिक क्रिश्चियन मिशेल याचे भारताला प्रत्यार्पण करण्यात आले असून मंगळवारी रात्री उशिरा दुबईहून त्याला दिल्लीत आणण्यात आले.
दुबई : अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात हवा असलेला ब्रिटीश नागरिक क्रिश्चियन मिशेल याचे भारताला प्रत्यार्पण करण्यात आले असून मंगळवारी रात्री उशिरा दुबईहून त्याला दिल्लीत आणण्यात आले.
३६०० कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात तो भारतातील तपास संस्थांना हवा होता. मागील महिन्यात न्यायालयाने मिशेलच्या (पान ६ वर)(पान १ वरून) प्रत्यार्पणासाठी परवानगी दिली होती. ‘खलीज टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, मिशेल (५४) याला मंगळवारी रात्री दुबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. प्रत्यार्पणाची ही प्रक्रिया इंटरपोल आणि सीआयडीच्या समन्वयाने झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त अरब अमीरातमधील (यूएई) आपले समकक्ष अब्दुल्ला बिन जायद यांच्याशी अबधाबीमध्ये चर्चा केली होती. सीबीआय आणि ईडीकडून केरण्यात आलेल्या चौकशीच्या आधारे भारताने मिशेलच्या प्रत्यार्पणासाठी औपचारिक स्वरुपात २०१७ मध्ये विनंती केली होती. ईडीने मिशेलविरुद्ध जून २०१६ मध्ये दाखल आपल्या आरोपपत्रात म्हटले होते की, मिशेलला अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात २२५ कोटी रुपये मिळाले होते. या आरोपपत्रानुसार, ही रक्कम म्हणजे कंपनीकडून दिलेली लाच होती.