‘एआय’ म्हणजे अमेरिका-इंडिया : नरेंद्र मोदी; अमेरिकी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 06:34 AM2023-06-24T06:34:30+5:302023-06-24T06:35:51+5:30

पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा मी येथे आलो तेव्हा भारत दहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होती. आज पाचव्या क्रमांकावर आहे. आता लवकरच तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

'AI' means America-India : Narendra Modi; Historic speech in the US Congress | ‘एआय’ म्हणजे अमेरिका-इंडिया : नरेंद्र मोदी; अमेरिकी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक भाषण

‘एआय’ म्हणजे अमेरिका-इंडिया : नरेंद्र मोदी; अमेरिकी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक भाषण

googlenewsNext

वॉशिंग्टन : ‘एआय’ म्हणजे अमेरिका-इंडिया, असे नव्या तंत्राशी नाते जोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळ भारताचा असेल, असे स्पष्ट मत अमेरिकी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात संबोधित करताना व्यक्त केले. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा मी येथे आलो तेव्हा भारत दहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होती. आज पाचव्या क्रमांकावर आहे. आता लवकरच तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पाकिस्तान, चीनकडे बोट दाखवत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ९/११ नंतर दोन दशके आणि मुंबईत २६/११ नंतर एक दशक उलटले तरीही कट्टरतावाद व दहशतवाद संपूर्ण जगासाठी गंभीर धोका आहे. दहशतवाद प्रायोजित करणारे व जगभर पसरवणाऱ्या सर्व शक्तींवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

आजपासून पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी हे शनिवारपासून इजिप्तच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १९९७ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनी इजिप्तला भेट दिली होती. त्यानंतर इतक्या वर्षांनी प्रथमच भारतीय पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहेत. 

‘हे युद्धाचे युग नाही’
‘मी थेट आणि जाहीरपणे सांगितले आहे की, हे युद्धाचे युग नाही, तर संवाद आणि मुत्सद्देगिरीचे आहे. 
रक्तपात आणि मानवी दुःख थांबवण्यास आपण सर्वांनी जे काही करता येईल ते केले पाहिजे’, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

चीनवर ताशेरे 
चीनवर ताशेरे ओढताना मोदी म्हणाले, ‘बळजबरी आणि संघर्षाचे काळे ढग हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात दाटले आहेत. प्रदेशाचे स्थैर्य ही आमच्या भागीदारीच्या मुख्य चिंतेपैकी एक बनली आहे. एक मुक्त व निर्भय हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र असावे, असे आमचे सामायिक धोरण आहे. 

Web Title: 'AI' means America-India : Narendra Modi; Historic speech in the US Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.