एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 07:48 AM2020-04-22T07:48:13+5:302020-04-22T10:44:08+5:30

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एवढ्यावरच न थांबता २००८ मध्ये जागतिक मंदीलाही अमेरिकेला जबाबदार ठरविले आहे.

AIDS, swine flu spread from America; Did anyone ask? The question of China hrb | एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल

एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल

Next

बिजिंग : चीनी कोरोना व्हायरसवरून सुरु झालेला वाद आता थांबायचे नाव घेत नाहीय. चीनला परिणाम भोगावे लागतील, चीनने मुद्दामहून कोरोना जगात पसरवल्याचे आरोप करणाऱ्या अमेरिकेला चीनने त्यांच्याच शब्दांच चोख प्रत्यूत्तर दिले आहे. चीनने याआधीच्या रोगराई, आजारांची जंत्रीच काढत तेव्हा का नाही दंड आकारला गेला असा सवाल केला आहे. 


एचआयव्ही, एच१एन१ व्हायरसचे केंद्र अमेरिकेत होते. असे असूनही तो जगभरात पसरला आहे. मग अमेरिकेला तेव्हा दंड का नाही केला गेला? आता कोरोना व्हायरसमुळे आमच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी का केली जात आहे. असा सवाल उपस्थित केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसची जागतिक महामारी पसरविण्यामागे चीन जबाबदार आहे, त्यांना या व्हायरसची माहिती होती याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. 


यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले आहे. प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, २००९ मध्ये एच1एन1फ्ल्यूचा संसर्ग झाला होता आणि जगातील २१४ देशांमध्ये तो पसरला होता. यामध्ये जगातील २ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. कोणी अमेरिकेकडे नुकसानभरपाई मागितली का? 80 च्या दशकामध्ये एड्स व्हायरसचा शोध पहिल्यांदा अमेरिकेमध्ये लागला होता यानंतर हा रोग जगभरात पसरला. या रोगाने अख्ख्या जगाची चिंता वाढवली होती. कोणी अमेरिकेला जबाबदार ठरवले का? असा सवाल उपस्थित केला. 


चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एवढ्यावरच न थांबता २००८ मध्ये जागतिक मंदीलाही अमेरिकेला जबाबदार ठरविले आहे. अमेरिकेमध्ये लेहमन ब्रदर्स ही १०० वर्षे जुनी बँक कोसळल्याने जगाला मंदीचा सामना करावा लागला. मात्र, कोणी अमेरिकेला सांगितले नाही की याचे परिणाम भोगावे लागतील, असा सवालही त्यांनी साऱ्या जगाला केला आहे. 

आणखी वाचा...

उद्धव ठाकरेंचं 'भविष्य' राजधानीत ठरणार; राज्यपाल थेट दिल्लीशी बोलणार!

लॉकडाऊनमध्ये Jio चे नशीब फळफळले; फेसबुकने 43574 कोटी रुपये गुंतवले

लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात

Web Title: AIDS, swine flu spread from America; Did anyone ask? The question of China hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.