एअर एशियाचे विमान बेपत्ता

By admin | Published: December 28, 2014 09:39 AM2014-12-28T09:39:04+5:302014-12-28T20:08:27+5:30

१६२ प्रवाशांना घेऊन इंडोनेशियाहून सिंगापूरला निघालेले एअर एशियाचे विमान रविवार सकाळपासून बेपत्ता झाले आहे.

Air Asia plane missing | एअर एशियाचे विमान बेपत्ता

एअर एशियाचे विमान बेपत्ता

Next

 ऑनलाइन लोकमत

जकार्ता, दि. २८ - इंडोनेशियाहून सिंगापूरला निघालेले एअर एशियाचे विमान रविवारी सकाळी बेपत्ता झाले आहे. या विमानात १६२ प्रवासी असून विमानासाठी शोध मोहीमही सुरु झाली आहे. 

इंडोनेशियातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रविवारी सकाळी पाचच्या सुमारास एअर एशियाचे QZ ८५०१ हे विमान सिंगापूरच्या दिशेने रवाना झाले. मात्र उड्डाणाच्या तासाभरानंतर विमानाचा जकार्ता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानात १५५ प्रवासी आणि ७ कर्मचारी असे १६२ जण आहेत. या विमानात एकही भारतीय नाही. विमानासाठी शोध घेण्यासाठी मोहीम सुरु झाली असून खराब हवामानामुळे शोधमोहीमेत अडथळे येत असल्याचे समजते. विमान बेपत्ता झाल्याचे समजताच विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी विमानतळावर धाव घेतली आहे. प्रवाशांसाठी एअर एशियाने हेल्पलाईनही सुरु केली आहे.  

एअर एशियाचा घटनाक्रम
> स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजून २० मिनीटांनी एअर एशियाचे QZ 8501 हे विमान १५५ प्रवासी व ७ कर्मचा-यांसह सिंगापूरच्या दिशेने रवाना झाले. सकाळी साडे आठच्या सुमारास हे विमान सिंगापूर विमानतळावर उतरणे अपेक्षीत होते.
> उड्डाणाच्या पाऊण तासानंतर म्हणजेच सहाच्या सुमारास विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमानाचा संपर्क तुटला त्यावेळी ते विमान इंडोनेशियातील हवाई क्षेत्रात होते. 
> वैमानिकाने नियंत्रण कक्षाशी साधलेल्या शेवटच्या संपर्काच्या वेळी खराब हवामानामुळे विमानाला नियोजीत मार्गापेक्षा अधिक उंचीवर नेण्याची परवानगी मागितली होती. सुरुवातीला विमान जमिनीपासून सुमारे ३२ हजार फूट उंचीवर होते. मात्र ढगाळ वातावरणामुळे विमान ३८ हजार फुट उंचीवर नेण्यात आले. 
> विमानाशी संपर्क साधण्यात अपयश येत असल्याने  इंडोनेशिया आणि सिंगापूरने संयुक्तरित्या शोधमोहीमेला सुरुवात केली. 
> विमान बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाल्यावर एअर एशियाने सोशल मिडीयावरील अधिकृत अकाऊंटवर कंपनीचा लोगो लाल रंगावरुन राखाडी रंगावर आणला. 
> एअर एशिया हा मुळची मलेशियातील कंपनी असून मलेशियाच्या पंतप्रधानांनी विमानाच्या शोधमोहीमेत मदत करण्याची तयारी दर्शवली. 
> पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुके अशा तिहेरी संकटामुळे शोधमोहीमेत अडथळे येत होते. 
> विमानात साडे चार तास उड्डाण घेता येईल ऐवढेच इंधन असल्याचे वृत्त. इंधन कमी असल्याने विमान कोसळल्याची चर्चा. 
> सुमात्रा बेटाजवळ एक विमान कोसळल्याचे वृत्त. मात्र विमान नेमके कुठे कोसळले आणि कोणत्या कंपनीचे विमान होते हे अद्याप अस्पष्ट. विमान कोसळल्याच्या घटनेलाही अधिकृत दुजोरा मिळाला नाही. 
> दुपारी एअर एशियाने विमानातील प्रवाशांची माहिती जाहीर केली. विमानात इंडोनेशियातील १४८, कोरियातील ३, सिंगापूर, ब्रिटन आणि मलेशियातील प्रत्येकी एक प्रवासी असल्याची माहिती. विमानात एकही भारतीय व्यक्ती नाही. 
> आम्ही आपातकालीन यंत्रणेच्या माध्यमातून विमानाचा कसून शोध घेत आहोत, आपण सर्वांनी खंबीर राहायला हवे - एअर एशियाचे प्रमुख टॉनी फर्नांडीस यांचे ट्विट
> विमानाच्या शोधमोहिमेसाठी भारतही सज्ज, नौदलाचे दोन जहाज व एक विमान मोहीमेत सहभागी होण्यासाठी तयार. 
> रात्रीच्या अंधारात शोधमोहीमेत अडथळे येण्याची चिन्हे असल्याने इंडोनेशियाने शोधमोहीम थांबवल्याचे वृत्त. उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीमेला सुरुवात करणार असल्याची सूत्रांची माहिती. 

Web Title: Air Asia plane missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.