एअर एशियाच्या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ अखेर हाती

By admin | Published: January 12, 2015 12:49 AM2015-01-12T00:49:25+5:302015-01-12T00:49:25+5:30

सिंगापूर- एअर एशियाच्या अपघातग्रस्त विमानाच्या शोधात अत्यंत महत्त्वाची घटना घडली असून, विमानाच्या ब्लॅकबॉक्सचा शोध लागला आहे.

Air Asia's aircraft 'Black Box' finally took over | एअर एशियाच्या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ अखेर हाती

एअर एशियाच्या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ अखेर हाती

Next

जकार्ता : सिंगापूर- एअर एशियाच्या अपघातग्रस्त विमानाच्या शोधात अत्यंत महत्त्वाची घटना घडली असून, विमानाच्या ब्लॅकबॉक्सचा शोध लागला आहे.
जावा समुद्राच्या तळाशी पडलेल्या फ्युजलेजच्या खाली हा ब्लॅक बॉक्स दबला होता. तो सोमवारी वर काढला जाऊन विमान अपघात कसा झाला याचा नक्की माग याच्या साहाय्याने काढता येईल.
१६२ प्रवाशांसह सुराबाया ते सिंगापूर जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर दोन आठवड्यानी हा ब्लॅक बॉक्स हाती लागला आहे.
इंडोनेशियाच्या के एन जदायत या नौकेवरील पाणबुड्यांना समुद्रात ३० ते ३२ मीटर खोलीवर हा ब्लॅक बॉक्स आढळला आहे. सध्या हा बॉक्स विमानाच्या तुकड्यांच्या ढिगाऱ्याखाली असून, सोमवारी सकाळी तो बाहेर काढला जाईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Air Asia's aircraft 'Black Box' finally took over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.