एअर एशियाचे बेपत्ता झालेले विमान समुद्रात कोसळले ?

By admin | Published: December 29, 2014 10:06 AM2014-12-29T10:06:35+5:302014-12-29T10:12:46+5:30

एअर एशियाचे बेपत्ता झालेले विमान इंडोनेशियातील सागरी क्षेत्रात कोसळल्याची शक्यता इंडोनेशियातील शोध पथकाचे प्रमुख बम्बग सोलिस्टिओ यांनी वर्तवली आहे.

Air Asia's missing plane collapses in the sea? | एअर एशियाचे बेपत्ता झालेले विमान समुद्रात कोसळले ?

एअर एशियाचे बेपत्ता झालेले विमान समुद्रात कोसळले ?

Next

  ऑनलाइन लोकमत 

जकार्ता, २९ - एअर एशियाचे बेपत्ता झालेले विमान इंडोनेशियातील सागरी क्षेत्रात कोसळल्याची शक्यता इंडोनेशियातील शोध पथकाचे प्रमुख बम्बग सोलिस्टिओ यांनी वर्तवली आहे. रडार आणि अन्य माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे विमान समुद्र तळाशी असावे असेही त्यांनी म्हटले आहे. 

इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला निघालेले एअर एशियाचे QZ ८५०१ हे विमान रविवारी सकाळी बेपत्ता झाले आहे. या विमानात १५५ प्रवासी आणि सात कर्मचारी असे १६२ जण आहेत. २४ तासांचा कालावधी लोटला तरी या विमानाचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही. यापार्श्वभूमीवर शोध पथकाचे प्रमुख सोलिस्टिओ यांना विमानाच्या लोकेशनविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले , आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे विमान कोसळण्याचे ठिकाण समुद्र असावे. पण हा प्राथमिक अंदाज असून अजूनही विमानाची शोधमोहीम सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, सोमवारी सकाळी पुन्हा एकदा विमानाच्या शोधमोहीमेला सुरुवात झाली. इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया हे देश शोधमोहीमेत सहभागी झाले आहेत. मात्र खराब हवामानामुळे शोधमोहीमेत अडथळे येत आहेत. 

Web Title: Air Asia's missing plane collapses in the sea?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.